पूर्वी अकलूजला धमक होती पण आता…रोहित पवारांनी मोहिते पाटलांना डिवचलं

पूर्वी अकलूजला धमक होती पण आता…रोहित पवारांनी मोहिते पाटलांना डिवचलं

पूर्वी अकलूजकरांमध्ये आता धमक राहिलेली नाही ती कुठंतरी मावळली असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते मोहिते पाटलांना डिवचलं आहे. विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो-सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्याचे कारण काय? ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंनी दिले प्रत्युत्तर

पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले, देशात असा एकही जिल्हा नाही जिथे 41 कारखाने आहेत. एखादा कारखाना आपल्या विचारांचा असो वा नसो शरद पवारांनी कायमचं कारखान्यांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. कारण शरद पवारांचा राजकीय प्रवास सोलापूर जिल्ह्यातून सुरु झाला असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

‘हे तर महाराष्ट्राचे वैरी, बाळासाहेब असते तर’.. शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्यावर राऊतांची आगपाखड

राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर शरद पवार दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातली विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठीच शरद पवारांचा हा दौरा असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे मोहिते पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून कमळ हाती घेतल्याने सोलापूरची राजकीय समीकरणं बदलली.

Barsu Refinery Project : सरकारनं जबरदस्ती केल्यास लोकं ऐकणार नाहीत…

आता ही बदललेली समीकरणे पुन्हा बदलण्यासाठी शरद पवारांची रणनीती सुरु असल्याची चर्चा सोलापूरात रंगलीय. पंढरपूरचे साखर सम्राट अभिजीत पाटील यांनी आज शरद पवारांच्या उपस्थिती राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात अभिजीत पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं संकेतही पवारांकडून देण्यात आले आहेत.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, आ. बबनराव शिंदे, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय पाटील, आ. कैलास पाटील, आ.रवींद्र धंगेकर, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महेश कोठे आदीसह मान्यवर उपस्थित हेाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube