अजितदादा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असले तर… आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

अजितदादा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असले तर… आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

Aditya Thackeray : राज्यात सध्या अनेक खळबळजनक घटना घडत आहेत. आधी अजित पवारांचे नॉट रिचेबल होणे. त्यानंतर अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. आता जर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून अजित पवार (Ajit Pawar) असतील तर का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही भाष्य केले आहे.

माथेरान हिल स्पोर्ट्स क्लबचे आज उद्घाटन झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी अजित पवार, राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि महाविकास आघाडीची भूमिका या मुद्द्यांवर भाष्य केले.

सीमाभागातील जनतेला सोडून दोन मंत्री कोणत्या बिळात लपले? राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका

अजित पवार हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असले तर शिवसेनेची भूमिका काय असेल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री कोण होणार याची सध्या महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा नाही.

ते पुढे म्हणाले, आज आपले राज्य अंधारात गेले आहे. खूप सारे उद्योजक राज्यात यायला तयार नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुंतवणूक होत होती मात्र आता तशी होत नाही. मी आधीपासूनच सांगत आहे की हे सरकार कोसळणार आहे. हे सरकार लोकशाहीविरुद्ध आणि घटनाबाह्य आहे. बेईमानांचं सरकार कधीही टिकत नाही त्यामुळे हे सरकार कोसळणारच आहे.

राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान 9 मिनिटे ‘बत्ती गुल’; अंधारातच केलं भाषण

दरम्यान, आदित्य ठाकरे हे आज माथेरान दौऱ्यावर होते. येथे त्यांनी माथेरान हिल स्पोर्ट्स क्लबचे उद्घाटन केले. तसेच माथेरानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेतील खेळाडूंना त्यांनी बक्षीसांचे वितरण केलं. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube