Nitin Desai Death : देसाईंच्या स्टुडिओबाबत राऊतांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Nitin Desai Death : देसाईंच्या स्टुडिओबाबत राऊतांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Sanjay Raut News : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार यांनी देसाई यांच्या स्टुडिओबाबत सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

नितीन देसाईंना ‘ते’ सहन झालं नाही; देसाईंच्या आत्महत्येवरून राऊतांचा भाजपवर संताप

खासदार राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देसाई यांच्या आत्महत्येवरून भाजपवर जोरदार टीका केली. तसेच एनडी स्टुडिओबाबत सरकारकडे महत्वाची मागणी केली. ते म्हणाले, देसाई देश सोडून गेले नाहीत ना त्यांनी कोणाला फसवलं. कर्जतचा जो स्टुडिओ आहे त्याला चित्रनगरीचा दर्जा द्यावा. कारण ते एक मराठी माणसाचं स्वप्न होतं. तुम्ही म्हणत आहात फिल्म सिटी व्हावी मग कर्जतमधील देसाईंच्या स्टुडिओला चित्रपटनगरीचा दर्जा देण्याबाबत सरकारने विचार करावा अशी मागणी राऊत यांनी यावेळी केली.

जे भाजपसोबत जातात त्यांची कर्जे माफ होतात

नितीन देसाईंसारखा कलाकार ज्याने आपल्या कर्तुत्वाचा ठसा चित्रपटसृष्टीत कष्टाने, मेहनतीने उमटवला. या देशातील सर्वात उत्तम स्टुडिओ त्यांनी उभारला. अनेक चित्रपटांची निर्मिती केली. अशा या महान कलाकाराचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू व्हावा. त्यांना मृत्यूला कवटाळावं लागलं. देसाई यांनी आत्महत्या करताना जी व्हाइस नोट आहे ती समोर आणली गेली पाहिजे. जे प्रामाणिक उद्योगपती आहेत त्यांना सध्याच्या काळात कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागते हे कळाले पाहिजे.

एका बाजूला देशातून हजारो कोटी रुपये घेऊन अनेकजण बँकांना बुडवून पळत आहेत. जे भाजपसोबत आहेत त्यांची कर्जे माफ होत आहेत आणि कारवाई सुद्धा होत नाही. मात्र एक हरहुन्नरी मराठी माणूस शे दीडशे कोटी रुपयांचं कर्ज आपण फेडू शकलो नाहीत. जे स्वप्न एन डी स्टुडिओच्या माध्यमातून उभं केलं ते स्वप्न माझ्यासमोर विखुरताना दिसत आहे. हे सहन न झाल्यामुळे नितीन देसाईंनी आत्महत्या केली असे राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube