अंधारेंचा मुनगंटीवारांना खोचक टोला; म्हणाल्या, एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याने त्यांना..

अंधारेंचा मुनगंटीवारांना खोचक टोला; म्हणाल्या, एकनाथ शिंदेंबरोबर गेल्याने त्यांना..

Sushma Andhare : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ (BJP) नेते तथा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विश्वासघात केल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी पहाटेचा शपविधी गरजेचा होता, असे वक्तव्य मंत्री मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आता शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुनगंटीवार यांच्या वक्तव्याबाबत नागपूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अंधारे यांना प्रश्न विचारला. त्यावर अंधारे म्हणाल्या, मुनगंटीवार यांनी धडा शिकविण्याची भाषा केली. पण, एकनाथ शिंदेंबरोबर जाऊन त्यांनी चांगलाच धडा शिकला आहे. म्हणून त्यांना आपण आगीतून उठून फुफाट्यात पडलो, असं वाटत असेल. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर अजून धास्ती घेतली आहे, असा टोला अंधारेंनी लगावला.

गृहनिर्माण सोसायट्यांसाठी गुडन्यूज! फडणवीसांनी दिलं ‘हे’ मोठं गिफ्ट

त्या म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्याने त्यांची नकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे बुंदसे गयी वो हौदसे नही आती हैं हे मुनगंटीवार यांच्या लक्षात येत नाही. म्हणून ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत.

काय म्हणाले मुनगंटीवार?

भाजपसोबत युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे भाजपशी कसे वागले, हे सगळ्यांना ठाऊक आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी जनादेश झुगारला. त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली. पण नंतर फसवणूक केली. यामुळं पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला.

डी. के. शिवकुमार यांचा सिद्धरामय्यांना पाठिंबा; सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube