राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष ‘या’ दिवशीपासून होणार सुरू

Untitled Design   2023 04 04T095131.424

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्या कधी पासून लागणार आहे याची तारीख समोर आली आहे. तसेच राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु होणार याबाबत देखील माहिती समोर आली आहे. राज्यातील शाळांना (Maharashtra School Summer Vacation) 2 मे पासून सुट्टी जाहीर झाली असून ही सुट्टी 11 जूनपर्यंत असणार आहे. नवीन शैक्षणिक (Maharashtra School New Academic Year) वर्ष 12 जूनपासून सुरु होणार आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

उन्हाळी सुट्टी व नवीन शैक्षणिक वर्ष
विद्यार्थी आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे उन्हाळी सुट्टी. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2023 ची उन्हाळी सुट्टी 2 मे ते 11 जून पर्यंत जाहीर करण्यात येत आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्ष सन 2022-23 हे 12 जूनपासून सुरू करणेबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र विदर्भातील उन्हाचा तडाखा पाहता यामध्ये काहीसे बदल करण्यात आले आहे. विदर्भातील नवं शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या चौथ्या सोमवार पासून म्हणजेच 26 जून पासून सुरू होणार आहे.

चिंता वाढली ! देशात पुन्हा एकदा सक्रिय होतोय कोरोना

इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शाळांना 30 एप्रिल रोजी किंवा त्यानंतर उन्हाळी सुट्टीच्या काळात जाहीर करता येणार आहे. हा निकाल संबंधित विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शाळांची असणार आहे. शाळातून उन्हाळी किंवा दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून नाताळ किंवा गणेशोत्सव दरम्यान समायोजन करण्याचे अधिकार शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने देण्यात येणार आहे.

ट्विटरच्या लोगोत बदल, चिमणी उडाली भुर्रर…आता ‘डॉगी’ दिसू लागला

शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या 76 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी, असं सुद्धा परिपत्रकात म्हटलं आहे. शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.

Tags

follow us