एमपीएससी परीक्षांमधील गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी! प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कागदपत्रांची पूर्तता कारण्यासाठी संबंधितांना पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
Major news regarding irregularities in MPSC examinations : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेलया नऊ विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटल्याचा प्रकरणांची चौकशी आता वेग घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणांच्या चौकशीसाठी गठीत आयोगाने निवेदने आणि प्रतिज्ञापत्रे सादर कारण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 16 नोव्हेंबर 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आता ही मुदत वाढवून 23 नोव्हेंबर 2026 करण्यात आली आहे.
या प्रकारणांशी संबंधित माहिती असलेल्या व्यक्ती, परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी चौकशी आयोगाने निश्चित केलेल्या नमुन्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कागदपत्रांची पूर्तता कारण्यासाटःई संबंधितांना पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
संबंधित व्यक्तींनी आपले निवेदन मराठी किंवा इंग्रजी भाषेत विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत, संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति आणि स्वप्रमाणीत प्रतिज्ञापत्र जोडावे लागणार आहे. याशिवाय प्रतिज्ञापत्र, निवेदन आणि संबंधित कागदपत्रांची एक पत्र आयोगाच्या अधिकृत ई-मेलवर देखील पाठवावी लागणार आहे.
Tata Sons IPO : टाटा समूहाची लिस्टिंग झाल्यास इतिहास बदलणार? नोएल टाटा यांनी व्यक्त केली मोठी चिंता
चौकशी आयोगाने तक्रार आणि निवेदने सादर करण्यासाठी complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in हा ई-मेल पत्ता उपलब्ध करून दिला आहे. तसेच प्रतिज्ञापत्र सादर करण्यासंदर्भात काही अडचण किंवा माहिती हवी असल्यास 022-20867677 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. दरम्यान, 23 नोव्हेंबर 2026 ही प्रतिज्ञापत्रे सादर करण्याची अंतिम मुदत असणार आहे. या तारखेनंतर प्राप्त होणारी प्रतिज्ञापत्रे स्वीकारली जाणार नसल्याचं चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे MPSC परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांबाबत काही महत्त्वाची माहिती किंवा पुरावे असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि संबंधित व्यक्तींनी मुदतीत आपली निवेदने सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या चौकशीतून नऊ स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांबाबत नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे आता परीक्षार्थी आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.