अजितदादांनी टोचले कोकाटेंचे कान पण राजीनाम्याला तूर्तास ब्रेक
Manikrao Kokate Resigns : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा

Manikrao Kokate : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार कोकाटे मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही. विधिमंडाळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार कोकाटे यांच्या राजीनाम्याला तूर्तास ब्रेक मिळाला आहे.
माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी देखील शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
नांदणी ग्रामस्थ भावूक, न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणी वनताराकडे रवाना
तुमच्यामुळे सरकारची बदनामी : अजित पवार
तर दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा केली. माणिकरावांकडून सतत चुका होत असल्याने आता माफी नाही अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. तसेच बोलताना आपण भान ठेवायला हव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. असं अजित पवार या बैठकीत माणिकराव कोकाटे यांना म्हणाले असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
तर अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त करत भविष्यात अशी वक्तव्ये करणार नाही अशी हमी कोकाटे यांनी अजित पवार यांनी दिली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.