“जरांगेंची डिफेंडर का नेली?”; सुभाष भोसलेंनी गाडी परत नेण्यामागचं कारण काय? चर्चांना उधाण

Manoj Jarange Defender Car; मनोज जरांगे पाटील यांच्या वापरातील पांढऱ्या रंगाची डिफेंडर गाडी अखेर तिच्या मुळ मालकाकडे परत करण्यात आली आहे.

Manoj Jarange Defender Car

Manoj Jarange Defender Car: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या वापरातील पांढऱ्या रंगाची डिफेंडर गाडी (Defender Car) अखेर तिच्या मुळ मालकाकडे परत करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीतील आंदोलनानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील याच डिफेंडरमधून अंतरवालीत पोहोचले. मात्र, गावात दाखल झाल्यानंतर ही गाडी संबंधित मालकाने परत नेली.

धक्कादायक! कठुआत CISF छावणीत जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; चार जवानांचा मृत्यू

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान एका मराठा बांधवाने जरांगे पाटील यांच्या वापरासाठी ही डिफेंडर दिली होती. सुभाष भोसले, रा. चिकमहूद, ता. सांगोला, हे या गाडीचे मालक असल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांनी स्वतः फोन करून गाडी घेऊन जाण्यास सांगितल्यानंतर भोसले यांनी ती परत नेल्याची माहिती समोर आली आहे.

डिफेंडरमधून प्रवास केल्याने जरांगे पाटील यांच्यावर टीकाही झाली होती. त्यावेळी त्यांनी आपण कोणत्याही गाडीतून प्रवास करू शकतो, असं म्हणत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं होतं. आपल्या समाजाची मुलं आपल्याला लाल दिव्याच्या गाडीत बसलेलं पाहावं, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.

मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; ’13 टक्के आरक्षणाचं उपवर्गीकरण करा’ , फडणवीस म्हणाले…

दरम्यान, सुभाष भोसले यांच्या व्यवसायावर तपास यंत्रणांच्या कारवाईची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे डिफेंडर गाडी परत करण्याच्या निर्णयामागे नेमकं कारण काय, याबाबतही चर्चा रंगली आहे.

follow us