‘हे’ दोन्ही एकच म्हणणं म्हणजे सामाजिक मुर्खपणा, मंत्री छगन भुजबळ मैदानात, केली मोठी घोषणा

  • Written By: Published:
‘हे’ दोन्ही एकच म्हणणं म्हणजे सामाजिक मुर्खपणा, मंत्री छगन भुजबळ मैदानात, केली मोठी घोषणा

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा (Jarange) चौथा दिवस आहे. या आंदोनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत. दरम्यान, जरांगेंच्या आंदोलनाला मुळे मुंबईतील व्यवहार ठप्प पडले आहेत, असा दावा करत थेट मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या याचिकांप्रकरणी न्यायालयाता आता 2 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. दुसरीकडे ओबीसीही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

मराठा समाज आणि कुणबी एक नाही हे कोर्टाचं म्हणणं आहे. मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं म्हणणे हे सामाजिक मुर्खपणा असल्याचं कोर्टानेच म्हटलय असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसंच, ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नकोत अशी भूमिका घेत आता ओबीसीचेही आंदोलन उभारण्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

उच्च न्यायालयात सुनावणी अन् मनोज जरांगेंचा मोठा विजय, राज्य सरकारला महत्वाचे निर्देश

ज्यभराताल्या ओबीसी संघटनांकडून मात्र जरांगे यांच्या मागणीचा विरोध केला जात आहे. आज (1 सप्टेंबर) छगन भुजबळ यांच्या उपस्थित राज्यातील महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अन्यथा आम्ही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ, असा इशाराच भुजबळ यांनी दिला आहे. त्यामुळे आता आरक्षणाचा मुद्दा जास्तच तापण्याची शक्यता आहे.

ओबीसी नेत्यांची बैठक झाल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना, कुठल्याही मुख्यमंत्र्‍याला किंवा सरकारला दोष देण्यात मला रस नाही. नियम, कायदा जे सांगतो तेच मी सांगतोय. त्यामुळे उगीचच हट्टाग्रह करत असेल तर सरकारने ते पाहून घ्यावं. पण आम्ही आता ठरवलं आहे. आम्ही उपोषण करणार. आम्ही जिल्ह्याजिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून मिरवणुका काढणार. आमच्यावर अन्याय झाला तर आम्हीसुद्धा लाखोंच्या लोंढ्याने मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच छगन भुजबळ यांनी दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या