मोठी बातमी : मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली; उपचारही नाकारले

Manoj Jarange- जरांगे पाटील यांना उलट्याचा खूप त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. जरांगे यांनी उपचार घ्यावेत, अशी विनंती सरकारी यंत्रणा आणि डॉक्टर करत आहेत.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Manoj Jarange

Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांनी उपचारही नाकारले आहे. त्यामुळे आंदोलनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जरांगे पाटील यांना उलट्याचा खूप त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. जरांगे यांनी उपचार घ्यावेत, अशी विनंती सरकारी यंत्रणा आणि डॉक्टर करत आहेत. परंतु जरांगे यांनी नकार दिला आहे. जरांगे यांचा उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.


मोठा राडा; ओबीसी आंदोलकांचा मोर्चा पोलिसांनी अडवला, पाटस टोलनाक्यावर वातावरण पेटलं!

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. 29 ऑगस्टला ते उपोषणाला बसलेले आहे. आज मंगळवारी उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. ते पाणीही घेत नाहीत. त्यामुळे जरांगे यांची आज प्रकृती बिघडली आहे. त्यांना उलट्यांचा त्रास होत आहे. सकाळी डॉक्टरांचे पथक त्यांची तपासणी करण्यासाठी आले होते. परंतु जरांगे यांनी तपासणी करण्यास नकार दिला. त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला होता. त्यामुळे पथकाला तपासणी न करताच परत जावे लागले आहे. त्यानंतर पुन्हा मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.


“सोनं खरेदी करु नका”; GDP वाढीनंतर मोदींचा देशवासीयांना सल्ला


जिल्हाधिकारी मध्यरात्री जरांगेंना भेटले

जालन्याचे जिल्हाधिकारी हे मध्यरात्री मनोज जरांगे यांच्या भेटीला आले होते. त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीय. तसेच वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली आहे.

आज दुपारी सरकारचे शिष्टमंडळ भेटणार
जरांगे यांची प्रकृती ढासळल्यानंतर सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. दुपारी तीन वाजता सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांना भेटणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ जरांगे यांना भेटून चर्चा करणार आहे.

follow us