शिंदेंशी संबंध बिघडण्यामागे संजय शिरसाट; ‘जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती…’ जरांगे थेट बोलले

Manoj jarange तीन वर्षांपासून शिंदेंबद्दल चांगली भाषा वापरत होतो. मात्र, मंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे आपले आणि शिंदे यांचे संबंध खराब झाले

  • Ninad K
  • Written By: Published:
Manoj jarange On Eknath Shinde Relation

Manoj jarange On Eknath Shinde Relation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झालेल्या मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आपण एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चांगली भाषा वापरत होतो. मात्र, मंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे आपले आणि शिंदे यांचे संबंध खराब झाले, असा थेट आरोप जरांगे यांनी केला. “जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती, त्यामुळे तसे शब्द वापरावे लागतात. मी पक्षाच्या बाजूने नाही, तर जातीच्या बाजूने बोलत आहे,” असं जरांगे म्हणाले.

राजकीय भांडणं करत राहू, पण… राऊतांनी पहिल्यांदा थोपटली सरनाईकांची पाठ…

‘मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी चूक केली’

आंदोलकांवर गुन्हे दाखल होत असल्याच्या मुद्द्यावरही जरांगे यांनी सरकारला लक्ष्य केलं. समाजाला हे सहन करावं लागेल, आपलं आपल्याला मिळत नाही आणि सरकार जाणूनबुजून हे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चूक केली आहे. त्यामुळे आपण बोलणारच, अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली. Manoj jarange On Eknath Shinde Relation

शिबिर नेमकं कशासाठी?

जात प्रमाणपत्रांशी संबंधित शिबिरांवरही जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केला. “हे शिबिर केवळ आंदोलनापुरते राबवले जात आहे की त्यामागे आणखी काही उद्देश आहे?” असा सवाल त्यांनी केला. मिळालेली जात प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी काही जणांच्या सल्ल्याने हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे का, हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले.

Video : आता मला आठवा रेकॉर्ड करायचाय; गडकरींनी सर्वांसमोर सांगितलं पुढचं टार्गेट…

‘शिकारीच्या वेळेला जेवण्याची वेळ नसते’

अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेच्यावेळी जेवायला येण्याचं निमंत्रण दिल्याबाबत विचारलं असता जरांगे यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिलं. ताईने सांगितलंय ना…मग जेवायला पण जाऊ…पण भाऊ मैदानात असताना, आंदोलन करत असताना बहिणीने जेवण्यासाठी भाऊला बोलवू नये. शिकारीच्या वेळेला इकडेतिकडे बघू नये. बहिणीने याबाबत बारकाईने विचार करावा. मी भाऊबीजेला जेवायला येईन. बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं, साडीचोळी घेऊन जाऊ, असं मनोज जरांगे म्हणाले. आज मी लढाईच्या मैदानात आहे, मायेची भावना ताईंनी आमच्या बाजूने ठेवावी. भाऊबीजेच्या वेळी साडी-चोळी घेऊन जातो. सध्या जेवण्याची वेळ नाही. शिकारीच्या वेळेला जेवण्याची वेळ नसते. आज भाऊ संकटात आहे,” असं म्हणत जरांगे यांनी सध्या आंदोलनाला प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं.

मुंबईत आम्ही जाणारच

सरकारच्या शिष्टमंडळाबाबतही जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “तीन वर्षांत मी कुणाचीही वाट पाहिली नाही. मी माझ्या जीवावर आंदोलन करतोय. यायचं असेल तर या,” असं ते म्हणाले. मुंबईत आम्ही जाणारच असून 12 तारखेला पुढील भूमिका जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं. सरकारला मार्गदर्शकाचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कारण तोडगा चांगला आहे की नाही, हे त्यांना कळेल, असं म्हणत जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

ताईने सांगितलंय ना, मग… अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया

बबन तायवाडेंवरही निशाणा

बबन तायवाडे यांच्या भूमिकेवरून जरांगे यांनी त्यांच्यावरही टीका केली. कुणाला म्हणाला तो? काय तुम्ही नेते? 50 टक्क्यांच्यावर गेलेल्या आरक्षणाबाबत बोला. आपल्याला आरक्षण कसं मिळालं, तेही पाहावं, असं ते म्हणाले. तायवाडे हेही कुणबीच आहेत, असा दावा करत त्यांना लाज वाटली पाहिजे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेलं, त्यावर बोलायला सांगा. 1994 मध्ये दिलेल्या बोगस आरक्षणावरही बोलायला सांगा, असा घणाघात जरांगे यांनी केला.

follow us