तब्बल तीन वर्षांनंतर जरांगेंचा उपोषण स्थळावरील मंडप हटवला; ग्रामस्थ अन् सरपंचांमध्ये रात्री काय घडलं?

Maratha Reservation Manoj Jarange मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळावरील मंडप हटवण्यात आला आहे. चर्चांना उधाण आले आहे.

Maratha Reservation Manoj Jarange

Maratha Reservation Manoj Jarange hunger strike site marquee removed by villagers and Sarpanch : अंतरवाली सराटीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या तब्बल तीन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आणि वारंवार उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळावरील मंडप हटवण्यात आला आहे. जरांगे यांच्या कोअर कमिटीशी झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थ अन् सरपंचांनी हा निर्णय घेतला आहे. यानंतर जरांगेंचं आता पुन्हा कधीही उपोषण करणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यातील मानाच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन; पुढच्या वर्षीच्या गणेश आगमनाची तयारी सुरू

ग्रामस्थ अन् सरपंचांमध्ये रात्री काय घडलं?

29 ऑगस्ट 2023 रोजी जेव्हा पहिल्यांदा मनोज जरांगे हे मराठा समाजाला ओबीस प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी उपोषणाला बसले होते. तेव्हा पासून तब्बल तीन वर्ष ते एकाच जागेवरून व एका मंडपातून सरकारकडे आरक्षणाची मागणी करत होते. तसेच सरकारचं शिष्टमंडल असो वा इतर मंत्री व नेते त्यांना इथेच येऊन भेटत होते.

दुष्काळी पाहणीसाठी सुनेत्रा पवार, आदित्य ठाकरे आज शेतकऱ्यांच्या बांधावर

एकीकडे जरांगे यांनी आपलं हे आता झालेलं उपोषण निर्णायक आणि अंतिम असल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर तब्बल तीन वर्षांपासून उभारलेल्या या मंडपावरून ग्रामस्थांमध्ये कुजबुज सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर जरांगे यांच्या कोअर कमिटीशी झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थ अन् सरपंचांकडून शुक्रवारी रात्री अखेर हा मंडप काढण्यात आला आहे.

बँक ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या रविवार असूनही बँका सुरू; सोमवारपासून 3 दिवसांचा संप, आजच उरकून घ्या बँकेची कामं

यामध्ये मंडपासह जरांगें जिथं बसत होते. ते स्टेज देखील हटवण्यात आलं आहे. मात्र या अगोदर गेल्या तीन वर्षांमध्ये जरागें हे अनेकदा उपोषणाला बसले. त्यांनी ते उपोषणं मागेही घेतले होते. मात्र हा मंडप जसाच्या तसा ठेवण्यात आला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी काही ग्रामस्थांनी या आंदोलनाला विरोध केला होता. तसं लेखी निवेदन देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. दुसरीकडे येत्या 28 तारखेला गावातील ग्रामसभेची बैठक होणरा आहे. त्यामध्ये या मंडपाला होणारा संभाव्य विरोध लक्षात हा मंडप हटवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

26 सप्टेंबर राशिभविष्य: शनिवारचा दिवस ठरणार खास! ‘या’ राशींना धनलाभ, प्रगतीची संधी; पाहा तुमची रास

आता मात्र हा मंडप हटवण्यात आल्याने जरागें यांनी आपलं हे आता झालेलं उपोषण निर्णायक आणि अंतिम असल्याचं सांगितलं होतं. त्या प्रमाणे त्याचं हे शेवटचं उपोषण होतं का? यानंतर ते आता कधीही उपोषण करणार नाहीत का? या अन् असा अनेक चर्चांना उधान आले आहे. मात्र या मागील ठोस कारण अद्यापही समोर आलेले नाही. यावर स्वत: मनोज जरांगे तसेच सरपंच हेच माहिती देऊ शकतात. मात्र जरांगे आता इथून पुढे अंतवालीत तरी उपोषण करणार नाही हे स्पष्ट होत आहे.

follow us