अंतरवलीत एकदा नाद केला, पुन्हा प्रयोग करू नका; जरांगेचा सरकारला गर्भित इशारा

अंतरवलीत एकदा नाद केला, पुन्हा प्रयोग करू नका; जरांगेचा सरकारला गर्भित इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी आज (22 डिसेंबरला) परभणीच्या सेलूमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी आरक्षणाची मागणी करताना सरकारला इशाराच दिला आहे. ते म्हणाले की, ‘सरकारने कोणत्याही नोटीस देऊन नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही.’ असा गर्भित इशाराच यावेळी जरांगे यांनी सरकारला दिला.

काय म्हणाले मनोज जरांगे?

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांचा पाचव्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे.यामध्ये आज परभणीच्या सेलूमध्ये भव्य सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामुळे आपण त्रास सहन केला तर आगामी पिढीला त्रास होणार नाही.

Chhagan Bhujbal : जरांगेंच्या नव्या आयडियांची भुजबळांनीही भुरळ; राज्य सरकारला सुचवला मध्यमार्ग

त्यामुळे सरकारने देखील मराठा समाजाची काळजी करावी. वेळ काढूनपणा करू नये. तसेच आता मराठा समाज सरकारच्या कोणत्याही नोटीसला घाबरणार नाही. मराठा समाज धमक्या देत नाही. करून दाखवतो. मात्र अंतरवाली सराट्यातील मराठा समाजाच्या शांततेतील आंदोलनावर सरकारकडून लाठी चार्ज करण्यात आला. त्यामुळे सरकारने कोणत्याही नोटीस देऊन नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असा इशारा यावेळी जरांगे यांनी सरकारला दिला.

Ahmednagar Politics : नगरच्या विकासासाठी काय केलं? आ. जगतापांनी विरोधकांना सुनावत यादीच दिली

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, मराठा समाजाचे 1967 पासून आरक्षणास पात्र असल्याचे पुरावे सापडले आहेत. तरीदेखील मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. तर ओबीसी साठी देखील संबंधित जाते मागास सिद्ध झालेली हवी. त्यामुळे मराठ्यांनी हे दोन्ही निकष पूर्ण केलेले आहेत. गायकवाड आयोगाने मराठा समाजाला 12 ते 13 टक्क्यांनी मागास सिद्ध केलं आहे. पण दुसरीकडे सरकारने ज्या जातींनी निकष देखील पूर्ण केलेली नाहीत. त्या जातींना देखील आरक्षणात घेतला आहे. मात्र मराठ्यांना निकष पूर्ण करून देखील आरक्षण मिळाले नाही. अशी खंत यावेळी जरांगे यांनी बोलून दाखवली.

सरकारने खेटायचे ठरवले तर खेटू द्या…

आम्हाला मुंबईला जायचं नाही. पण जायचं ठरवलं तर मुंबई आमची नाही का? मुंबईला आम्ही जायचं नाही का? मुंबईतील शेअर मार्केट, मंत्र्यांचे बंगले, कलाकारांचे बंगले पाहू द्या. मराठा समाजातील आंदोलकांना अटक केली. तर सर्वच जन पोलीस ठाण्यात जाऊन बसा. लाखोंच्या संख्येने जाऊन बसा सरकारने खेटायचे ठरवले तर खेटू द्या. तसेच यावेळी जरांगे यांनी समाजातील तरुणांना आवाहन केले की तुमची शक्ती कमी होऊ देऊ नका. मग सरकार कसा आरक्षण देत नाही, हे पाहतो. सरकारला गाडीवर मराठा समाजाने बसवले. त्यामुळे आरक्षण दिले नाही. तर तुमच्या अंगाला गुलाल लागणार नाही. असाही इशारा जरांगे यांनी या सभेमध्ये दिला.

तर भुजबळांवर बोलताना ते म्हणाले, सरकारचे शिष्टमंडळ माझ्याकडे आलं होतं. त्यांनी मला सांगितलं की, भुजबळांवर बोलू नका. मात्र भुजबळ जर आरक्षणावर बोलले. तर मी देखील त्यावर बोलणार. असे मी त्यांना स्पष्ट सांगितलं असेही यावेळी जरांगे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube