मराठवाड्याकडे दुर्लक्षच! एकही ‘एसडीआरएफ’चे पूर्णवेळ पथक नाही, अनेकांचा जातोय जीव

मराठवाड्याकडे दुर्लक्षच! एकही ‘एसडीआरएफ’चे पूर्णवेळ पथक नाही, अनेकांचा जातोय जीव

SDRF Team In Marathwada : मराठवाड्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातीलच एक मोठी अडचण म्हणजे राज्य आपत्ती निवारण बलाची स्वतंत्र एकही तुकडी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात नाही. त्यामुळे पावसाळा वगळता इतर वेळी निर्माण झालेल्या आपत्ती काळात मदत पुरवण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. (Marathwada) त्याचबरोबर गोल्डन अवरमध्ये मदत न मिळाल्याने अनेक जीव जातात. (SDRF) ही सर्व परिस्थिती पाहता राज्य आपत्ती निवारण बलाची स्वतंत्र तुकडी पूर्णवेळ कार्यरत ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

वेळेत मदत उपलब्ध होत नाही  मराठा ओबीसीमधूनच आरक्षण घेणार; नेत्यांनी विरोध करण्यापेक्षा सहकार्य करावं -जरांगे पाटील

राज्यात कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांमार्फत तातडीने मदतकार्य केले जाते. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण बलाच्या (एनडीआरएफ) अंतर्गत राज्य आपत्ती निवारण बल कार्यरत असते. त्यामुळे आपत्ती काळामध्ये अनेक जीव वाचू शकतात. संपूर्ण मराठवाडा विभागासाठी पावसाळ्यामध्ये एसडीआरएफची केवळ एक तुकडी नियुक्त केली जाते जी अपूर्ण आहे. तसंच, आपत्ती ही काही सांगून येत नाही. त्यामुळे मराठवाड्यासाठी एसडीआरएफची स्वतंत्र पूर्णवेळ तुकडी नियुक्त करणे गरजेचे झालं आहे. दरम्यान, विदर्भात नागपूर आणि धुळे या दोन ठिकाणी एसडीआरएफची स्वतंत्र तुकडी कार्यरत आहे. मात्र, मराठवाड्यात आपत्ती निवारण बलाची तुकडी नसल्याने वेळेत मदत उपलब्ध होत नाही.

राज्यात बारा ठिकाणी एसआरपीएफ केंद्र

जालना, सोलापूर, मुंबई, पुणे, दौंड, अमरावती, नागपूर, हिंगोली, धुळे, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, कोल्हापूर या १२ ठिकाणी राज्य राखीव बलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आणि कोल्हापूर या ठिकाणी राखीव बलाच्या तीन तुकड्या ठेवल्या आहेत. राज्य राखीव पोलीस बलातील जवानांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देऊन राज्य आपत्ती निवारण बलाची तुकडी कार्यरत केली जाते. विदर्भातील नागपूर आणि धुळे या ठिकाणी एसडीआरएफची तुकडी कार्यरत आहे. मराठवाड्यासाठीही छत्रपती संभाजीनगर, हिंगोली किंवा जालना येथे एसडीआरएफची पूर्णवेळ तुकडी कार्यरत करणं सोयीचं होऊ शकतं.

मदतीसाठी लागतात ७ ते १० तास

पावसाळा वगळता इतर काळात मराठवाड्यामध्ये आपत्ती परिस्थिती निर्माण झाली तर मदतकार्य मागवण्यासाठी किमान ८ ते १० तास लागतात. धुळे येथून एसडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी ८ तास तर पुणे येथून एनडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी किमान १० तास लागतात. इतका वेळ जर मदतीला लागले तर त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागतो. परंतु, आपत्ती काळात गोल्डन अवर असलेल्या पहिल्या एक तासात मदत मिळाली तर अनेक जीव वाचू शकतात. त्यामुळे मराठवाड्यातून ही मागणी जोर धरून आहे.

एका तुकडीत ३५ जवान   राज्यात ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी

राज्य आपत्ती निवारण बलाच्या एका तुकडीमध्ये एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, दोन चालक आणि ३० जवान अशा ३५ जणांचा समावेश असतो.

२८ जणांचे वाचविले होते जीव

मागील वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यासाठी नियुक्त केलेली एसडीआरएफची टीम नांदेड येथे मुक्कामी होती. या पथकातील जवानांनी मुदखेड, अर्धापूर, कासारखेडा, माहूर आदी ठिकाणी बचाव कार्य करून २८ जणांना पुरातून बाहेर काढलं होतं. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढून त्याचा जीव वाचविण्याचं मोलाचं काम एसडीआरएफच्या जवानांनी केलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube