परवानगीशिवाय बोलू नका अन्…, राज ठाकरेंचा नेत्यांना आदेश; पोस्ट व्हायरल

परवानगीशिवाय बोलू नका अन्…, राज ठाकरेंचा नेत्यांना आदेश; पोस्ट व्हायरल

Raj Thackeray :  हिंदी सक्ती प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर जोरदार टीका करत मराठी भाषेविरोधात बोलणाऱ्यांना इशारा दिला आहे. तर आता मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठा निर्णय घेत पक्षातील नेत्यांना आदेश दिला आहे. माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही असा इशारा राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना दिला आहे. याबाबत राज ठाकरे यांनी एक्स वर पोस्ट करत माहिती दिली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,  एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. असं राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही. असा आदेश राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना दिला आहे.

तर दुसरीकडे राज्य सरकारने विद्यार्थ्यांवर पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्याने वरळी डोम येथे 5 जूलै रोजी राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा साजरा केला होता. तर आज दोन्ही पक्षातील नेत्यांनी  मिरा भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा उपस्थित करत आंदोलन केले आहे. तर आता राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आदेश देत माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही असं पक्षातील नेत्यांना सांगितले आहे.

राज्यात भाषावाद अन् केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महायुतीला मिळणार दिलासा?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube