धक्कादायक! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा

Untitled Design (20)

औरंगाबाद : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये तब्बल 700 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलंय. लग्नामध्ये जेवण केल्यानंतर अनेक लोकांची प्रकृती बिघडली. सुदैवानं वेळीच उपचार मिळाल्यानं सर्वजण बचावले आहेत. विषबाधा झालेल्या सर्वांवर औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा लग्नसोहळा बुधवारी आयोजित केला होता. यावेळी मुलीकडच्यांनी आलेल्या पाहुण्यांसाठी विविध प्रकारच्या जेवणाचं नियोजन केलेलं होतं. मात्र यावेळी बनवलेल्या स्वयंपाकामुळं अनेक लोकांना विषबाधा झाल्याचं समोर आलंय.

कदीर मौलाना यांच्या मुलाचा विवाह बुधवारी 4 जानेवारीला मोठ्या थाटामाटात पार पडला. पाहुण्यांनी जेवण केल्यानंतर गोड पदार्थाचं नियोजन होतं. हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पाहुण्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अनेकांच्या पोटात दुखायला लागल्यानं त्रास होण्यास सुरुवात झाली. जवळजवळ 400 ते 500 जणांना एकाच वेळी घाटी रुग्णालयात व एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात अबाल वृद्धांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us