प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; म्हणाल्या, “पुन्हा बोलावलं तर हजर राहीन”

Meenakshi Shinde On Pradip Purnekar Murder Case; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची पोलिसांनी चौकशी केली.

Meenakshi Shinde On Pradip Purnekar Murder Case

Meenakshi Shinde On Pradip Purnekar Murder Case: ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा येथील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीनंतर मीनाक्षी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. “पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावलं, तर मी नक्की हजर राहीन. पहिल्या दिवसापासून मी पोलिसांना सहकार्य करत आहे,” असं त्या म्हणाल्या.

नागपुरात भाजपला धक्का बसणार? अभिजित वंजारी 7 हजार मतांनी पुढे, नितेश कराळेंचीही घोडदौड सुरु

पुन्हा चौकशीसाठी बोलावलं तर हजर राहणार

पोलिसांच्या चौकशीबाबत बोलताना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, “माझी पहिल्या दिवसापासूनची भूमिका स्पष्ट आहे. पोलिसांनी जेव्हा बोलावलं, तेव्हा मी चौकशीसाठी हजर राहिले आणि त्यांना सहकार्य केलं. मला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे की नाही, याची अद्याप कल्पना नाही. मात्र, ज्या दिवशी बोलावलं जाईल, त्या दिवशी मी नक्की हजर राहीन.”

अमित त्रिवेदी यांनी राधिका बन्सल यांच्या ‘मीठे में क्या है’ चित्रपटातील ‘इचक दाना बिचक दाना’ गाण्याद्वारे उत्सवाचा उत्साह द्विगुणित केला

माझ्या प्रभागातील लोकांसोबत फोटो असणारच!

या प्रकरणाच्या संदर्भात काही फोटोंवरून प्रश्न उपस्थित केले जात असल्याबाबतही त्यांनी उत्तर दिलं. “माझ्या प्रभागात राहणाऱ्या लोकांसोबत माझे फोटो असणारच. एखाद्या भागात राहणाऱ्या लोकांना मी ओळखणार नाही का? त्यावरून कोणी मुद्दा उपस्थित करत असेल, तर मी काय बोलणार? याबाबत मी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे,” असं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं.

तेच तेच प्रश्न पुन्हा विचारले जातात

चौकशीदरम्यान वारंवार तेच प्रश्न विचारले जात असल्याबाबत त्या म्हणाल्या, “तेच तेच प्रश्न पुन्हा विचारले जात असतील, तर त्यावर काय बोलावं? संबंधित बाबी यापूर्वीही समोर आल्या आहेत. ही पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. तपासातील प्रत्येक गोष्ट माध्यमांसमोर उघड करायची असेल, तर तपासाचा अर्थ काय राहील?”

विधान परिषद मतमोजणीत मोठे उलटफेर होणार?, पहिल्या कलांमुळं राजकीय वर्तुळात खळबळ

पोलिसांचा तपास सुरू असताना त्याच्याशी संबंधित प्रत्येक बाब माध्यमांसमोर सांगणं योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

बंदुकीबाबत मीनाक्षी शिंदे काय म्हणाल्या?

बंदुकीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, “पाखरांना हाकलण्यासाठी गावांमध्ये अशा प्रकारच्या बंदुका असतात, हे लहान मुलालाही माहीत आहे. त्यावरून कोणी मुद्दा उपस्थित करत असेल, तर त्याला मी काय उत्तर देऊ?”

चौकशीदरम्यानच्या घडामोडींबाबत म्हणाल्या…

चौकशीदरम्यान नेमकं काय घडलं, याबाबत विचारलं असता, “माझी चौकशी सुरू होती आणि माझा जबाब नोंदवला जात होता. त्यामुळे इतर घडामोडींबाबत मला माहिती नाही,” असं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं.

न्यूझीलंडमध्ये धावांचा अभिषेक! 199 धावांचं लक्ष्य भेदत विजय मिळवला, अनेक विक्रम मोडले

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून, मीनाक्षी शिंदे यांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे.

follow us