‘गदारोळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा मिळणं आवश्यकचं’; खासदार निलंबनावर आठवले बोलले

‘गदारोळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा मिळणं आवश्यकचं’; खासदार निलंबनावर आठवले बोलले

Ramdas Athavle Speak on MP’s Suspend : संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा मिळणं आवश्यकचं असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी खासदार निलंबन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, संसदेत घुसखोरी झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गदारोळ घालत सत्ताधारी सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी शिस्तभंगाचा ठपका ठेवत 140 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यावरुन संघर्ष सुरु असतानाच आता रामदास आठवलेंनीही यावर भाष्य केलंयं. ते मिरजमधून बोलत होते.

कॉंग्रेस आमदाराच्या वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, पाच जण जखमी, दर्यापूरमधील घटना

रामदास आठवले म्हणाले, संसदेत काही युवकांनी वेलमधून उड्या मारल्या ते चुकीचं आहे. त्यावर चर्चा करण्याऐवजी विरोधी खासदारांकडून संसदेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना शिक्षा मिळणं आवश्यकच असल्याचं रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.

तसेच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून संसदेत प्रेक्षक गॅलरीतून युवकाने उड्या मारल्याने विरोधक संसदेचे कामकाज चालवू देत नाहीत. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ज्या विषयावर चर्चा करायची असेल तर त्यासाठीच प्रश्न काळ असून झिरो आवर आहे. यामध्ये प्रश्न मांडणे आवश्यक असते. पण काही खासदार वेलमध्ये येऊन सातत्याने गोंधळ घालत होते. त्यांना शिक्षा करणे आवश्यकच होते, म्हणून त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Bachhu Kadu : …तर ‘आपको हम भुल जायेंगे’; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना थेट पाठिंबा काढण्याचा इशारा!

दरम्यान, देशातील बेरोजगारी काही आमच्या सरकारच्या काळातील नाही. काँग्रेसचे सरकार गेली 70 वर्षे होते. तेव्हा ही बेरोजगारी होतीच. आमच्या सरकारने साडे आठ लाख नोकऱ्या दिल्या आहेत. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत युवकांनी वेगवेगळ्या योजनाचा लाभ घेऊन स्वयंरोजगार सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे, असंही रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.

ससंदेत सुरक्षेच्या प्रश्नावरुन आवाज उठवल्याने विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाच्या तब्बल 150 खासदारांना निलंबित केल्याचं समोर आलं. संसदेत घुसखोरीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गदारोळ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

संसदेत चार जणांनी घुसून स्मोक कॅंडलने धूर सोडल्याने संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता संसदेत घुसखोळी टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता CISF कडे सोपवण्यात आली आहे. याआधी ही जबाबदारी दिल्ली पोलिसांकडे होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube