कॉंग्रेस आमदाराच्या वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, पाच जण जखमी, दर्यापूरमधील घटना

  • Written By: Published:
कॉंग्रेस आमदाराच्या वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, पाच जण जखमी, दर्यापूरमधील घटना

Balwant Wankhade Car Accident : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील लखापूर फाट्यानजीक वानखडे यांच्या गाडीने धडक दिल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. सुदैवाने आमदार वानखडे हे आमदार यशोमती ठाकूर यांच्या गाडीत असल्यानं बचावले.

‘भुजबळांचा बोलवता धनी कोण हे महाराष्ट्राला कळलंय’; सतेज पाटलांचे गंभीर आरोप 

मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूर अंजनगाव सुर्जी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडेंच्या गाडीला लाखापूर फाट्याजवळ आज अपघात झाला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. शेतातील कापूस वेचून शेतकरी व शेतमजूर ट्रॅक्टरने घरी जात होते. त्यावेळी आमदार वानखेडे यांच्या गाडीने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झालेत. या भीषण धडकेत आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला. यावेळी आमदार वानखडे हे आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाहनाच्या जात होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

तिसऱ्यांचा ईडीची नोटीस; चौकशीसाठी बोलविले पण अरविंद केजरीवालांनी दिल्ली सोडली 

या अपघाताबद्दल बोलतांना आमदार वानखडे यांनी सांगितले की, आम्ही नागपूरहून दर्यापूरला येत होतो. त्यावेळी मी आमदार यशोमती ठाकूर यांचा गाडीत बसलो होतो. माझ्या कारमध्ये माझा सचिव आणि ड्रायव्हर होते. लाखापूर फाट्याजवळ एका मजुराचा ट्रॅक्टर रस्त्यावर मधोमध उभा होता. दरम्यान, चालकाला ट्रॅक्टर न दिसल्याने हा अपघात झाला. या अपघातात मोहम्मद खलीलचा मृत्यू झाला. याबद्दल मला खूप दुःख झालंय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. काँग्रेस कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळं रस्त्यावर बरीच वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतुक सुरळीत करून रुग्णालयात हलवले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube