Yogesh Kadam On Manoj Jarange : मनोज जरांगे सुपारीबाज…मंत्री योगेश कदमांची थेट टीका

Yogesh Kadam On Manoj Jarange :  मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून पुढे आलेले मनोज जरांगे यांची आंदोलनाची दिशा आता भरकटली असून

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Yogesh Kadam On Manoj Jarange

Yogesh Kadam On Manoj Jarange :  मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून पुढे आलेले मनोज जरांगे यांची आंदोलनाची दिशा आता भरकटली असून, ते कोणाची तरी सुपारी घेऊन काम करत असल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीच्या पद्धतीने लक्ष्य करून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. जरांगेंचा सध्याचा हेतू मराठा समाजाच्या हिताचा दिसत नसल्याची टीका कदम यांनी केली.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी त्यांच्या सरकारने घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. यापूर्वी कोणत्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते. मनोज जरांगे यांनी आंदोलन केले, उठाव केला, त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसादही दिला. आता त्यांच्या आंदोलनाची दिशा भरकटत असल्याचे दिसत आहे.

मराठा समाजाच्या प्रश्नांपेक्षा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बदनाम करण्यावरच भर दिला जात असल्याचे कदम म्हणाले. जरांगे (Manoj Jarange) यांनी काही नावे लवकरच समोर आणणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना कदम यांनी, त्यांनी ती नावे समोर आणावीत. कोणताही स्रोत कायम लपून राहत नाही. आज ना उद्या सत्य बाहेर येणारच आहे, असे आव्हान दिले. या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यातून शंभर टक्के निष्कर्ष समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सराव करणाऱ्या तरुणांसाठी मिशन खाकी

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ‘मिशन खाकी’ सुरू करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. मागील वर्षी पोलीस भरतीसाठी तब्बल साडेअठरा लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ग्रामीण भागातील तरुणांना सराव करताना अनेक अडचणी आणि सुविधांचा अभाव जाणवतो. या तरुणांना सरावासाठी आवश्यक साहित्य, सुविधा आणि शासनाचे सहकार्य मिळाले पाहिजे. केवळ गुणवत्ता असून चालत नाही, तर तयारीसाठी आवश्यक साधनेही मिळाली पाहिजेत. याच उद्देशाने मिशन खाकी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात गुंडांना पोलिसांचा धाक दाखवा

पुण्यातील वाढती दादागिरी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवरही योगेश कदम यांनी आक्रमक भूमिका मांडली. गुंडांना पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून दिले पाहिजे. मुंबईत दादागिरी चालणार असेल तर ती केवळ पोलिसांचीच चालली पाहिजे, असे आपण यापूर्वीही स्पष्ट केले आहे. हाच दृष्टिकोन पुण्यातही ठेवण्याची गरज आहे. कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस प्रशासनाने त्याला सडेतोड उत्तर दिले पाहिजे. यासाठी शासनाकडून ज्या काही मदतीची आणि उपाययोजनांची आवश्यकता असेल, ती पूर्ण करण्यास सरकार तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

डिलिमिटेशन भाजपचा कट; पाठिंबा देणारे जनतेशी विश्वासघात करत आहे.. संजय राऊत स्पष्टच म्हणाले

पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा केवळ देखावा

पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना कदम यांनी वादाचे अस्तित्वच नाकारले. सुनेत्रा पवार या पालकमंत्री असून त्या योग्य पद्धतीने हा विषय हाताळत आहेत. जाणूनबुजून वाद निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात यामध्ये कोणताही वाद असल्याचे आम्हाला वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

follow us