विखेंना धक्का, अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत खासदार लंकेंनी मारली बाजी

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यामध्ये

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Nilesh Lanke

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या पारनेर मतदार संघातून खासदार निलेश लंके यांचा विजय झाला असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे राहुल शिंदे यांचा पराभव झालेला आहे.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीला (Ahilyanagar District Bank Election) मतमोजणीला सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात झाली असून दहा जागांच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते दरम्यान 11 जागा या बिनविरोध झालेले होत्या उर्वरित दहा जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली.

आज मंगळवार रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर पारनेरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून यामध्ये खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचा विजय झाला असून जिल्हा बँकेच्या राजकारणात या विजयाने लंके यांचा प्रवेश झाला असून राधाकृष्ण विखे यांचे निकटवर्ती समजले जाणारे राहुल शिंदे (Rahul Shinde) यांना मोठा धक्का मानला जात आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणूक; अटीतटीच्या लढतीमध्ये पालकमंत्री शुंभूराज देसाई विजयी-

विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून लंके यांनी एकूण 104 मतदानांपैकी 64 मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि विखे समर्थक मानले जाणारे भाजपचे राहुल शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालाने जिल्हा बँकेच्या राजकारणात लंके यांनी दमदार प्रवेश केला असून विखे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.  या लढतीत खासदार लंके आणि भाजपचे राहुल शिंदे आमनेसामने होते. दोन्ही बाजूंनी विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मात्र, मतमोजणीचा निकाल जाहीर होताच लंके यांनी बाजी मारली. 64 मतांचा कौल मिळवत त्यांनी प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू मानली जाते. या बँकेच्या सत्ताकारणात प्रवेश मिळवण्यासाठी जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. अशा परिस्थितीत पारनेरमधून मिळालेला लंके यांचा विजय केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण देणारा ठरण्याची शक्यता आहे. विखे समर्थक उमेदवाराचा पराभव आणि लंके यांचा विजय यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात आता कोणाचे पारडे जड ठरणार, याची उत्सुकता वाढली आहे.

follow us