MPSC विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री शिंदे व शरद पवारांसोबतची आजची बैठक रद्द

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (67)

एमपीएससी (MPSC )  विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांच्या बरोबरची आजची बैठक  रद्द झाली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar )  हे देखील उपस्थित राहणार होते. या विद्यार्थ्यांना दोन दिवसांनंतर भेटण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले आहे.

एमपीएससीचे विद्यार्थी गेल्या चार दिवसांपासून बालगंधर्व   चौकात आंदोलन करत आहेत. एमपीएससीचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आज सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. पण मुख्यमंत्री शिंदे हे आज सायंकाळी मुंबईत नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

(राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच अजित पवार यांचा पुतळा जाळायला सांगितला, शिंदे गटाचा खळबळजनक दावा)

दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी आंदोलन करणाऱ्या एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरुन संवाद देखील साधला होता. तसेच विद्यार्थ्यांनी उपोषण देखील सुरु केले होते. पण शरद पवारांनी हे उपोषण सोडायला लावले होते. या पार्श्वभूमीवर आजची बैठक आयोजित करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांनी एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी देखील त्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. पण आता एमपीएससी आयोग नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करायला तयार नाही आहे. यावरुन गरज पडल्यास आयोगाच्या विरोधात न्यायालयात जाऊ, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube