राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच अजित पवार यांचा पुतळा जाळायला सांगितला, शिंदे गटाचा खळबळजनक दावा

  • Written By: Published:
ajit pawar_LetsUpp

राष्ट्रवादीनेच अजित पवार यांच्या बदनामीचा कट रचला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या या आरोपाने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे.

नरेश म्हस्के यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हा धक्कादायक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आम्हाला फोन करून अजित पवार यांचा पुतळा जाळून टाकण्यास सांगितलं होतं.” नरेश म्हस्के यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : Live Blog | Thackeray Vs Shinde : तिसऱ्या दिवशीही कपिल सिब्बल यांचाच युक्तिवाद

संजय राऊत मातोश्रीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी गुंडांवर बोलूच नये. त्यांच्यासोबत फक्त तेच लोक फिरतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलून संजय राऊत मातोश्रीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सामान्य शिवसैनिकामध्ये संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली, संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेची ही अवस्था झाली. शिवसेनेचे धनुष्यबाण आणि नाव गेलं. अशी चर्चा चालू आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला होता. त्यावरही राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती, नरेश म्हस्के यांनी दिली. ते म्हणाले की स्वतःची सुरक्षा वाढवून घेण्यासाठी तरुण खासदारावर गुन्हा दाखल करण चुकीचे आहे.

Tags

follow us