Municipal Corporation Election Result : मुंबईत ठाकरे गटाची शिंदेंवर मात; भाजपची आघाडी

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : राज्यातील 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल

  • Written By: Published:
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : राज्यातील 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आज सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Jan 2026 01:56 PM (IST)

    मुंबई महापालिका निवडणूक; शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ विजयी

    मुंबई महापालिका निवडणूक; शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ विजयी

    शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ प्रभाग 22 मधून विजयी. या प्रभागात 3 उमेदवार भाजपचे विजयी.

  • 16 Jan 2026 01:40 PM (IST)

    जालन्यात MIM चं खातं उघडलं ; भाजपला मोठा धक्का

    जालन्यात MIM चं खातं उघडलं

    जालन्यात MIM चे दोन उमेदवार विजयी,

    प्रभाग क्रमांक 11 मधून सायरा फकरुल्ला खान, खान नगमा बी फिरोज खान विजयी

  • 16 Jan 2026 01:30 PM (IST)

    सोलापुरात शिंदे गटाला मोठा धक्का, भाजपचे चार ही उमेदवार विजयी

    सोलापुरात शिंदे गटाला मोठा धक्का, भाजपचे चार ही उमेदवार विजयी

    सोलापूर महापालिकेतील प्रभाग 24 मध्ये भाजपचे चार ही उमेदवार विजयी झाले आहे.  सोलापूर शहर भाजपचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे,अश्विनी चव्हाण,वनिता पाटील आणि मधुसूदन जंगम  विजयी

  • 16 Jan 2026 01:23 PM (IST)

    मुंबई महापालिका निवडणूूक : माजी विरोधी पक्षनेते रवी राजा पराभूत

     काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा पराभूत

    प्रभाग 185 मध्ये काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा पराभव झाला आहे.   या प्रभागात ठाकरे गटाचे
    जगदीश थेवलपी विजयी झाले आहे.

  • 16 Jan 2026 12:54 PM (IST)

    पुणे महापालिका निवडणूक :  प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी

    पुणे महापालिका निवडणूक :  प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी

    प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी झाले आहे.  किरण दगडेपाटील, दिपाली पवार, अल्पनाताई वरपे, दिलीप वेडेपाटील विजयी तर

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांचा पराभव

  • 16 Jan 2026 12:45 PM (IST)

    पुणे महापालिका सहकारनगर पद्मावती भाजपाचे चारही उमेदवार विजयी...

    पुणे महापालिका सहकारनगर पद्मावती भाजपाचे चारही उमेदवार विजयी...

     

    भाजपाचे चारही उमेदवार विजयी

    महेश वाबळे भाजप
    5000  मतांनी विजय.

    भोसले शैलजाभाजप
    2595 मतांनी विजय

    सई थोपटे भाजप
    2400 मतांनी विजय

    विना घोष भाजप
    4000 मतांनी विजय

    आबा बागुल
    अश्विनी कदम
    सुभाष जगताप
    यांचा पराभव.

  • 16 Jan 2026 12:36 PM (IST)

    अमरावतीमध्ये भाजपला दुसरा मोठा धक्का

    अमरावतीमध्ये भाजपला दुसरा मोठा धक्का

    अमरावतीमध्ये भाजपला दुसरा मोठा धक्का लागला असून  साई नगर प्रभागात भाजपचे नेते तुषार भारतीय पराभूत झाले आहे. तर याआधी मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाचा पराभव झाला होता.

  • 16 Jan 2026 12:18 PM (IST)

    अहिल्यानगर महापालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक 4 मध्ये एमआयएम 3 जागेवर विजयी

    अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये एमआयएमचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर काँग्रेसने बाजी मारली आहे.

  • 16 Jan 2026 12:10 PM (IST)

     अमरावतीमध्ये भाजला मोठा धक्का ; मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाचा पराभव

     अमरावतीमध्ये भाजला मोठा धक्का…

    अमरावतीमध्ये भाजला मोठा धक्का बसला असून मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाचा पराभव झाला आहे. तर पुण्यात प्रशांत जगताप यांचा विजय झाला असून त्यांच्या आईचा मात्र पराभव झाला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा होत्या. आता निकाल हाती येत आहेत.

  • 16 Jan 2026 12:01 PM (IST)

    पुणे महानगरपालिका निवडणूक : काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप विजयी

    भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप जिंकले

    माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते... त्याच भाजपाच्या अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी केला पराभव

    प्रशांत जगतापांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं

    प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला

     

    प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी लढवली निवडणूक अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप जिंकले

Tags

follow us