पत्रकारांच्या गराड्यात अजितदादा म्हणाले, मला पुन्हा-पुन्हा नॉटरिचेबल म्हणू नका

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 08T170750.719

Ajit Pawar :  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिग्रीचा विषय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा या सर्व विषयावर भाष्य केले. तसेच काल अजित पवार हे नॉच रिचेबल असल्याची चर्चा होती.त्यावर देखील ते बोलले आहेत.

मी कुठेही नॉट रिचेबल नव्हतो. मी तब्येत बरी नव्हती. फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी औषध घेऊन आराम करत होते. त्यामुले तुम्ही अशा प्रकारे मी नॉट रिचेबल होतो असे बोलत जाऊ नका, असे म्हणत अजित पवारांनी नॉट रिचेबल असण्याच्या चर्चांना उत्तर दिले आहे. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीविषयी देखील विचारण्यात आले. यावर देखील त्यांनी आपले उत्तर दिले आहे.

Kirit Somayya : मढ मालाड येथील बेकायदा स्टुडिओला आदित्य ठाकरेंचा आशिर्वाद

राजकारणात शिक्षणाचा मुद्दा हा गौण आहे. वसंतदादा पाटील यांचे शिक्षण देखील कमी झालेले होते. पण त्यांच्याच कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शाळा व कॉलेजस सुरु झाल्या. अजूनही महाराष्ट्र त्यांचे योगदान विसरला नाही. त्यामुळे डिग्रीचा मुद्दा गौण आहे. २०१४ साली भारतातल्या जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिलेले आहे, त्यामुळे हा मुद्दा फार महत्वाचा आहे, असे वाटत नाही, असे पवार म्हणाले आहेत.

Ghar Banduk Biryani : ‘घर बंदूक बिरयानी’चा धिंगाणा, नागराजचा हलगीवर आकाश-सायलीने धरला ठेका

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देखील भाष्य केले आहे. त्यांना दौऱ्यासाठी शुभेच्छा आहेत. ज्यांची जिथं श्रद्धा असते त्यांनी तिथे जावं, त्याबाबत आमचे दुमत नाही. आम्ही देखील देवदर्शनाला जातो पण जाताना सांगत नाही, असे म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.

Tags

follow us