भावी खासदार बाळासाहेब थोरातसाहेब तुम आगे बढो…; कार्यकर्त्यांच्या घोषणांनी चर्चांना उधाण
Ahmednagar : कांदा निर्यात शुल्कावरुन सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नगर दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. शेतकर्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
69th National Film Awards : सलील कुलकर्णींचा ‘एकदा काय झालं’ सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भावी खासदार बाळासाहेब थोरात आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार
माथाडी काँग्रेस कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, माथाडी शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी यावेळी थोरातांची भेट घेत नगर दक्षिणेतून थोरात यांनी स्वतः उमेदवारी करावी यासाठी कामगारांच्यावतीने आग्रह धरला.
यावेळी किरण काळे यांच्यासह ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, बाबासाहेब वैरागर, दीपक काकडे, विजयराव शिंदे, जयराम आखाडे, आकाश भोस, अमर डाके, राधेश भालेराव, गोरख जाधव, दिनेश निकाळजे, किशोर ढवळे, सुनील नरसाळे, नाना दळवी, विनोद केदारे, राजेंद्र तरटे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर नगर तालुक्यातील खडकी गावात त्यांनी कांदा, दुधाच्या प्रशासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. शेतकरी हिताची आक्रमक भूमिका काँग्रेस घेईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच नगर शहरात लोकसभेची आढावा बैठक पार पडली. यावेळी दक्षिणेच्या लोकसभेसह नगर शहर विधानसभेच्या जागेवर काँग्रेसने दावा ठोकला होता.
खासदारकीला बाळासाहेब थोरात आणि नगर शहरातून विधानसभेला किरण काळे यांना उमेदवारी देण्याची यावेळी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी हंडोरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर थोरात यांचा नगर शहरासह, नगर व श्रीगोंदा तालुक्यांच्या दौऱ्यामुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.