चौंडीतील उपोषणकर्त्यांकडे विखेंनी फिरवली पाठ, दखल न घेतल्याने धनगर आंदोलक संतप्त

चौंडीतील उपोषणकर्त्यांकडे विखेंनी फिरवली पाठ, दखल न घेतल्याने धनगर आंदोलक संतप्त

Dhangar reservation : धनगर आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून चौंडी (Chaundi) येथे यशवंत सेनेचे कार्यक्रर्ते उपोषणाला बसले आहेत. आतापर्यंत सरकारने आपला कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मध्यस्थी करण्यासाठी चौंडीला जाणार होते. यासाठी त्यांचा दौराही ठरला होता. पण विखे पाटील यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. अगोदरच नाराज असलेल्या धनगर समाजातील उपोषणकर्त्यांचा राग आणखी तीव्र झाला आहे.

जालन्यात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होते. त्याचवेळी धनगर आरक्षणासाठी चौंडी येथे यशवंत सेनेचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची राज्य सरकारने दखल घेते वेगवेगळे जीर काढले, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी 17 व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सुटले. पण गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या धनगर उपोषणकर्त्याकडे मात्र सरकारने पाठ फिरवली आहे.

Raju Shetti : कृषीमंत्र्यांनी लक्षात ठेवावं ते बीडचे कृषीमंत्री नाहीत; राजू शेट्टीचा मुंडेंना टोला

राधाकृष्ण विखे पाटील आंदोलनस्थळी जाणार म्हणून या भेटीला महत्व प्राप्त झाले होते. पण त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी याचा निषेध करत अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. या वेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच वटहुकुम निघाला नाही तर पुढे महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

NCP : पक्षसंघटनेत दुर्लक्ष, जिल्ह्यांकडेही फिरवली पाठ; अजितदादा, पटेलांनी मागितलं मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. गेल्या दहा दिवसांत विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला आहे. पण सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. सरकारने उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube