विखे पाटलांची ‘हॉटलाईन’ पुन्हा होणार अ‍ॅक्टिव्ह! दिल्लीत अमित शाहंसोबतची भेट फिक्स

विखे पाटलांची ‘हॉटलाईन’ पुन्हा होणार अ‍ॅक्टिव्ह! दिल्लीत अमित शाहंसोबतची भेट फिक्स

अहमदनगर : कांदा निर्यात बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दर पडत असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलने करत आहेत. याच मुद्द्यावरुन आता खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत जानेवारी महिन्यात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत असल्याची माहिती त्यांनी दिली. (MP Sujay Vikhe Patil has said that he will meet Union Home Minister Amit Shah.)

अहमदनगर तालुक्यात विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी विखे पाटील बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्याच्या प्रमुखांसह गृहमंत्री शाह यांची भेट घेणार आहे. या भेटीत कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठीची चर्चा करणार आहे. तसेच कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाय कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange : आम्ही सज्ज, तयारीही पूर्ण; जरांगेंनी सांगितलं मुंबईतील उपोषणाचं प्लॅनिंग

विखे पाटील अन् हॉटलाईन :

विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने तक्रार केली जाते की दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी वेळच मिळत नाही. विरोधी पक्षातील नेत्यांचा हा सुर असताना भाजपमधील जुन्याजाणत्या आणि वरिष्ठ नेत्यांनाही काहीसा असाच अनुभव येतो. मात्र चार वर्षांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत अनेकदा थेट भेट घेतली आहे.

जी गोष्ट राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबाबतीत तेच गोष्ट आता त्यांच्या सुपुत्र आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्याबाबतीत होताना दिसते. सुजय विखे पाटील आणि पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शाह यांच्या भेटीचेही फोटो अनेकदा व्हायरल झालेले आहेत. विखे पाटील यांना दिल्लीतील भाजपमध्ये मिळणाऱ्या या ‘स्पेशल ट्रिटमेंट’ची राज्यातील भाजपमध्ये मात्र दबक्या आवाजात वेगळीच चर्चा चालू असते.

‘फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती; राज्यात लवकरच डॉक्टरांचं मंत्रीमंडळ होणार’

विखे-पाटील यांना भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांची भेट मिळत असल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ राज्य भाजपच्या राजकारणात काढले जातात. त्यांच्या या भेटींमुळे दिल्लीतील विखे पाटील पिता-पुत्रांची यांची हॉटलाईन राज्याच्या राजकारणात सतत चर्चेचा विषय असते. आता पुन्हा एकदा कांदा प्रश्नासाठी ते ही हॉटलाईन अ‍ॅक्टिव्ह करणार आहेत. त्यामुळे आता आगामी काळात कांद्याचा प्रश्न सुटणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube