आमदार असताना विकासासाठी काही केले नाही…रोहित पवारांचा राम शिंदेना टोला

  • Written By: Published:
Ram Shinde Rohit Pawar

अहमदनगर : राम शिंदे आमदार दहा वर्षे असूनही त्यांनी विकासासाठी काही केले नाही. मी तिथे आमदार झाल्यानंतर ही तीन वर्षे विकास कामे केली. राम शिंदे आमदार असताना त्यांनी विकासाची कामे करून घराच्या लॉन वर मांडण्याचे काम केले. मागच्या दरवाजा एन्ट्री करून आमदार झाल्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना कारवाई व त्यांच्यावर निलंबन केले. असा टोला रोहित पवारांनी राम शिंदेंना लगावला.

जयंत पाटलांचा भाजपसोबत काँग्रेसलाही धक्का…अनेक पदाधिकारी करणार पक्ष प्रवेश 

लोकांची मते रोहित पवारांकडे असल्यामुळे त्यांच्या कारखानावर कारवाई करा. अधिकाऱ्यांनी चौकशी करून खोटे आरोप लावून बीजेपी ची सत्ता असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. नंतर आमच्या कारखान्याच्या डायरेक्टर वर पोलीस केस केली. कंपनीत चौकशी करा बीजेपीच्या काळातील चौकशी चालू होती आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतरही केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी चालू आहे. असे देखील यावेळी रोहित पवार म्हणाले.

‘काँग्रेस सरकारमध्ये वीज नव्हती, त्यामुळे लोकसंख्या वाढली’, केंद्रीय मंत्र्यांचा अजब दावा

आता असे बोलले जाते की माझ्यावरती कारवाई होईल. आम्ही लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणार मतदार संघातील हिताचे बोलत राहू एखाद्या मंत्र्यांनी चुकीची कामे केली आणि सत्तेत असेल तर त्याच्यावर कारवाई होत नाही. पण विरोधकांवर कारवाई करतात आम्हाला कोर्टाचा मार्ग मोकळा आहे. बीजेपी चे मुंबईचे प्रमुख शिंदे गटाच्या नेत्यांविरोधात कोर्टात गेले कोर्टाने सुनावणी दिल्यानंतर काय होईल ही बघण्यासारखी गोष्ट आहे. असे पवार म्हणाले.

Tags

follow us