शिरूरने कायम योग्य निर्णय घेतला, प्रश्न विचारणाऱ्या खासदाराला निवडून द्या -शरद पवार
लोकसभेत प्रश्न विचारणारा खासदार असावा. तिथे जाऊन प्रश्न विचारणार नसाल तर कशाला खासदार व्हायचे असं म्हणत शरद पवारांनी अमोल कोल्हेंच कौतूक केलं.

Sharad Pawar Shirur Sabha : आज महाराष्ट्रातून संसदेमध्ये महत्वाचे आणि कायम प्रश्न मांडण्याचं काम करतात ते दोनच खासदार आहेत, ते म्हणजे माझी मुलगी सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे हे दोन खासदार आहेत. यांच्यापैकी कुणी बोलायला उठलं आणि त्यावेळी पंतप्रधान जरी बाहेर जात असले तरी ते थांबतात असंही पवार यावेळी म्हणाले. ते कोल्हे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
तीन आमदारांनी मार्ग बदलला
तुम्ही लोकसभेत जाऊन लोकांचे प्रश्न मांडत नसताल तर तुम्हाला का निवडून द्यायचं असा प्रश्नही पवार यांनी यावेळी उपस्थित केला. तसंच, येथील चार आमदार राष्ट्रवादीचे होते. मात्र, यातील तिघांनी रस्ता बदलला आहे. आता तुम्ही लक्षात घ्या यावेळी आपल्याला काय करायचंय असं म्हणत पवार यांनी कोल्हे यांना संधी देण्याचं आवाहन केलं. तसंच, तीन आमदारांनी आपला मार्ग बदलल्याने जो एक आमदार राहीलाय त्यांनाच मंत्री म्हणून संधी मिळेल असंही पवार यावेळी म्हणाले.
तुम्ही मला कायम मत दिली
अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून आम्हाला चांगला उमेदवार देता आला. तसंच, तुम्ही मला सलग चार वेळा मत दिली. मी अनेकदा आपल्याला मत मागायलाही आलो नाही. तरी तुम्ही मला मत दिली. या काळात सत्ता असो किंवा नसो मी आपलं काम करण्याचं काम केलं. तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेता असंही पवार म्हणाले.
सत्ता नसतानाही विकास करता येतो
मी गेली 56 वर्ष विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा अशा सभागृहात आहे. त्यापैकी 20 ते 22 वर्ष मंत्री असेल. बाकी, 30 वर्षांपेक्षा जास्त काळ मंत्री नव्हतो. मात्र, विकास करता आला नाही असं नाही. मी विकास केलाच. त्यामुळे सत्तेत असतानाच विकास करता येतो असं नाही असंही पवार यावेळी म्हणाले.