नऱ्हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन

दररोज रात्री 8.30 वाजता ही व्याख्यानमाला आॅनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.

  • Written By: Published:
Untitled Design (23)

Organizing an online lecture series : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे सहावी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणा-या समाजसुधारकांपैकी महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.आंबेडकर हे होते. त्यामुळे त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात येत आहे. दिनांक 12 ते 17 एप्रिल दरम्यान दररोज रात्री 8.30 वाजता ही व्याख्यानमाला आॅनलाईन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटस्चे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.

व्याख्यानमालेमध्ये प्रखर राष्ट्रवादी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ॠणानुबंध, डॉ.आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शोध घेताना, डॉ.आंबेडकर यांचे देशाच्या फाळणी संबंधी विचार अशा विविध विषयांवर नामवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या https://www.youtube.com/c/JadhavarGroupAdvShardulraoSudhakarraoJadhavar या यू टयूब पेजवरुन ही व्याख्याने प्रसारित होणार आहेत.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, व्याख्यानमालेत सामाजिक कार्यकर्ते व व्याख्याते निलेश धायरकर, लेखक व संपादक बापूराव घुंगरगांवकर, नेस वाडिया कॉलेज आॅफ कॉमर्सच्या प्राचार्य डॉ.वृषाली रणधीर, अ‍ॅड. क्षितीज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व लेखक भरत आमदापुरे यांच्या मार्गदर्शनासह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांच्या व्याख्यानाने मालिकेचा समारोप होणार आहे. सर्व व्याख्याने विनामूल्य असून विद्यार्थी व तरुणाईने मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

follow us