‘लय पवार घरी यायला लागले आहेत, मात्र …’, बारामतीकरांना अजित पवारांची साद

  • Written By: Published:
‘लय पवार घरी यायला लागले आहेत, मात्र …’, बारामतीकरांना अजित पवारांची साद

Ajit Pawar  : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. ही यात्रा आज बारामती मतदारसंघात दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान बोलताना गेल्या काही दिवसांपासून घरात लय पवार येऊ लागेल आहे, गेल्या 25-30 जे आले नव्हते ते पण आता घरी येत आहे मात्र पुढे तुम्हाला काय करायचं हे तुमच्या हातात असं अजित पवार म्हणाले.

जनसन्मान यात्रेदरम्यान आयोजित सभेमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळाली म्हणून आम्ही आज मोठे निर्णय घेत आहे. बारामतीमध्ये आता बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लय पवार घरी यायला लागले आहे, गेल्या 25-30 वर्षात जे आले होते नव्हते ते देखील आता मतदारसंघात फिरत आहे. हे पवार आणि ते पण पवार मतदारसंघात फिरत आहे मात्र पुढे तुम्हाला काय करायचं हे तुमच्या हातात आहे असं अजित पवार म्हणाले.

तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. निवडणुकीनंतर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही ही योजना बंद करणार नाही अशी ग्वाही देखील या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात सर्वात जास्त विकास आपल्या बारामतीमध्ये झाले आहे. राज्यातील 288 मतदारसंघापैकी सर्वात जास्त विकासनिधी बारामतीला मिळाला आहे. बारामतीसाठी लवकरच मी ब्ल्यू प्रिंट काढणार आहे. बारामतीमध्ये  कॅन्सर हॉस्पिटल काढणार आहे तसेच बारामतीमध्ये अनेक योजना राबवायच्या आहेत असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट, बहिणींनींच केला वनराज यांचा गेम; बंडू आंदेकरांची पोलिसांत फिर्याद….

बारामती आता शिक्षणाचं हब झालं आहे. बारामतीमध्ये अनेक जण बाहेरून शिकायला येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे. बारामतीमध्ये जर कुणी मुलींची छेड काढली तर खपवून घेणार नाही. बारामतीमध्ये पोलिसांचा दबदबा असला पाहिजे असेही या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube