Akole Long March : किसान सभेच्या मोर्च्याला पोलिसांची नोटीस, आंदोलक मात्र मोर्चावर ठाम

Akole Long March : किसान सभेच्या मोर्च्याला पोलिसांची नोटीस, आंदोलक मात्र मोर्चावर ठाम

Police gives notice to Kisan sabha ‘Long March’ : सध्या शेतकऱ्यांना (farmer) विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळं (Unseasonal rain) शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीचा प्रश्न, दुग्ध धोरण या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या (Kisan Sabha) पुढाकाराने मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध मागण्यांसाठी आज 26 एप्रिल ते 28 एप्रिल 2023 या काळात अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चा (march) दुपारी तीन वाजता निघणार आहे. राज्यातील अनेक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रुपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलन करून तीव्र देणार जाणार असल्याचा इशारा देखील किसान सभेनं दिला आहे.

Viral Video: किली पॉलचा मराठमोळा अंदाज व्हायरल, बहिणीसोबत थिरकला ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील गाण्यावर

मात्र आता या मोर्चाला पोलिसांनी उन्हाच कारण देत नोटीस बजावाली आहे. अद्याप या मोर्चाला पोलिसांनी हिरवा कंदिल दाखवलेला नाही. खारघरच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. अकोले पोलिसांकडून मोर्चेकरांना 149 ची नोटीस बजावण्यात आलेली आहे. किसान सभा मात्र आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे या आंदोलनाचं काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

राज्यातील मागील दोन हंगामात अतिवृष्टीनं शेती पिकांच मोठं नुकासान झालं आहे. सरकारनं या पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या मोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र, अद्याप कुठलीही मदत करण्यात आली नाही. दुध, कापूस, सोयाबीन, हिरडा, तुर, हरभरा पिकांना रास्त भावाची हमी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube