दानिश हिंगोरासोबतच्या कनेक्शनवरून राजकारण तापलं, भाजपनंतर आता अंधारेंचीही उडी

दानिश हिंगोरासोबतच्या कनेक्शनवरून राजकारण तापलं, भाजपनंतर आता अंधारेंचीही उडी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एका महिलेने एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाच्या विरोधात त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, लाच ऑफर केल्याच्या आरोपांनंतर अटक झालेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या वडिलांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. शिवाय, तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जयसिंघानीचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वीर अमृता फडणवीस यांनी एका अनिक्षा नावाच्या डिझायनर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. या डिझायरने अमृता फडणवीसांना एक कोटीची लाच ऑफर झाल्याची माहिती आहे. याबाबत अमृता फडणवीस यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अनिक्षा जयसिंघानीचे वडील म्हणजे कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी यांनी 2014 साली तत्कालीन शिवसेनेत प्रवेश केला होता, असा दावा केला जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण, याप्रकरणावरून भाजप आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. रोज या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा फेसबुक, युट्यूबवर एंट्री

उद्धव ठाकरे यांच्यासोबत जयसिंघानीचा फोटा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, कुणाचाही कुणासोबतचा फोटो दाखवून चर्चित चर्वण करणाऱ्या आणि स्क्रिप्टेड स्टोरी वर काम करणाऱ्या भक्तगणांनी हा फोटो नीट बघून घ्यावा आणि आपल्या सावकाशीनं प्रतिक्रिया द्याव्या, असं ट्विट त्यांनी केलं. या ट्विटमध्ये त्यांनी अमृता फडणवीस आणि दानिश हिंगोरा यांचा एकत्र फोटोही शेअर केला.

सुषमा अंधारे यांनी एक ट्विटही रिट्वीट केलं. त्यात लिहिलं की, दानिश हिंगोरा हा NIA ने मुंबईतून ताब्यात घेतलेला समीर हिंगोराच मुलगा आहे. 1993 सालच्या मुंबई बॉम्बस्पोट प्रकरणी समीर हिंगोराला हायकोर्टाची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, अमृता फडणवीस आणि समीर हिंगोरा याचा दानिश हिंगोरा यांचा एकत्र असतांनाचा फोटो सुषमा अंधारे यांनी ट्विट केल्यानंतर आता युवा नेते आदित्य ठाकरे आणि दानिश हिंगोरा यांचाही फोटो सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube