प्रदीप पूर्णेकर प्रकरणात केस लढायला तयार पण मला एकनाथ शिंदे आडवे येतील; गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक आरोप
Gunaratna Sadavarte On Pradeep Purnekar Case : शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्याने संपूर्ण
Gunaratna Sadavarte On Pradeep Purnekar Case : शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना देखील अटक केली आहे मात्र आतापर्यंत मुख्य आरोपी फरार असल्याने आरोपीला अटक करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी महापैर मिनाक्षी शिंदे (Meenkashi Shinde) आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) हे सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) म्हणाले की, मी प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्यासाठी ही केस लढायला तयार आहे. पण या प्रकरणात मी वकील होऊ नये, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. या केसमध्ये मी प्रदीप पूर्णेकर यांच्या बाजून लढू नये यासाठी दुसरं तिसरं कोणी नाही तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच आडवे येतील. ही गोष्ट मी निडरपणे डंके की चोटपर सांगत आहे असं माध्यमांशी बोलताना सदावर्ते म्हणाले.
पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, तसेच माझी पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की, एखाद्या आरोपीचा आरोपी म्हणून यादीत समावेश होत नाही तोपर्यंत तो तोंड उघडत नाही. त्याला कायद्याचा खाक्या दाखवावा लागोत. जोपर्यंत त्या व्यक्तीला मॅजिस्ट्रेटसमोर नेऊन पोलीस कोठडीत पाठवत नाही तोपर्यंत आरोपी तोंड उघडत नसतात. प्रदीप पूर्णेकर यांची हत्या ड्रीम प्रोजेक्टमुळे झाली.
…तर पंतप्रधान मोदींशी चर्चा करा ; अभिजीत दिपकेंना अमेरिकन गायिका मेरी मिलबेनचं प्रत्युत्तर
यामध्ये केवळ लहान गोष्टीच पुढे केल्या जात आहेत. ही एक अशाप्रकारची रचना आहे की, कोणाला दुसऱ्यालाच म्हणजे एखाद्या नगरसेवकाला चर्चेत ठेवायचे आणि या प्रकरणाचा तपास संपवायचा. या प्रकरणात दाढीवाला अजगर आहे का? हे देखील पाहिलं पाहिजे असं देखील माध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले. सदावर्ते यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.