…तर शिवसेनेप्रमाणे उमेदवार उभा करता आला असता का? पुणे पदवीधर निवडणूक, प्रफुल पटेल काय म्हणाले

Praful Patel On Graduate and Teachers Constituency Election : राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची

Praful Patel On Graduate And Teachers Constituency Election

Praful Patel On Graduate and Teachers Constituency Election : राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असताना महायुतीमध्ये देखील जागा वाटपावरुन वाद पेटला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षकाची जागा भाजपकडे गेली असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार उभा कसा काय केला? यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) न मिळाल्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहेत. जर महायुतीच्या (Mahayuti) प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पदवीधर आणि शिक्षकची जागा भाजपकडे गेली असेल तर मग शिक्षकसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने (Shivsena) उमेदवार उभा कसा काय केला? आम्हाला देखील शिवसेनेप्रमाणे पदवीधरमधे उमेदवार उभा करता आला असता का? याबाबत पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती असं माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले आहे. प्रफुल पटेल यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी हर्षदा देशमुख-जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश चिवटे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

iPhone 16 तब्बल 18 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या भन्नाट ऑफर-

या निवडणुकीसाठी 9 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने आता पुन्हा एकदा काही नवीन ट्विस्ट येणार का? याबाबत देखील अनेक चर्चांना उधाण आले आहे. मतदान 23 ऑक्टोबर 2026 रोजी आणि मतमोजणी 27 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे.

follow us