Prakash Ambedkar यांनीही हात झटकले : शिंदे-ठाकरे भांडणात मी पडणार नाही!

Prakash Ambedkar यांनीही हात झटकले : शिंदे-ठाकरे भांडणात मी पडणार नाही!

पुणे : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे (Eknath Shinde-Uddhav Thackeray) या दोघांमधील भांडण सोडवायला मी जाणार नाही. ज्यांचे-ज्यांचे भांडण आहे त्यांनी-त्यांनी ते आपापसात बसून सोडवावे. मी शक्यतो अशा भांडणात पडत नाही. तसेच सध्या एकनाथ शिंदे हे भाजपच्या प्रेमात पडले आहे. त्यामुळे मी त्यांना काय सांगू की तुम्ही प्रेम करू नका, त्यामुळे अशांना मी काय सांगू, त्यांचे ते पाहून घेतील, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सध्या टोकाला गेला आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सध्या प्रचंड घमासान सुरु आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तर संघर्ष आणखीनच चिघळला आहे, असे याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी शिंदे-ठाकरे वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेणार का, याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एकनाथ शिंदे हे सध्या भाजपच्या प्रेमात पडले आहेत. त्यांना मी कसे सांगू की तुम्ही भाजपवर प्रेम नका करू. ते काय लहान नाहीत. त्यांना सर्व कळत आहे. त्याचबरोबर शिंदे आणि ठाकरे यांची भांडण सोडवायला मी जाणार नाही. माझं असं मत आहे की ज्याचं भांडण आहे त्यानेच ते सोडवायला हवे. तसेच दुसऱ्याच्या भांडणात मी हस्तक्षेप देखील करत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube