प्रकाश आंबेडकरांचा थेट आरएसएसच्या मुळावरच घाव, कार्यप्रणालीवर स्पष्टच बोलले
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि आरएसएस यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु असतं. अशातच पकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वोच्च पदाबाबत मोठं विधान करीत टीका केलीय. आरएसएसच्या सरसंघचालक पदावर जेवढे आले त्यांनी कधीच संत तुकाराम महाराजांच्या एकाही जयंतीला हजेरी लावली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते अकोल्यात ओबीसी परिषदेत बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, आरएसएसच्या सरसंघचालक पदावर जेवढे आले त्यांनी कधीच संत तुकाराम महाराजांच्या एकाही जयंतीला हजेरी लावली आहे का? आता या आरोपातून मुख्त होण्यसाठी पुढील वर्षी सरसंघचालक हजेरी लावतील, असं खोचक विधानही त्यांनी यावेळी केलं आहे.
Shambhuraj Desai यांची खोचक टीका : ‘मातोश्री’त बसून उद्धव ठाकरे निवडणूक आयोगही बरखास्त करू शकतात…
तसेच आपलं ताट खाली आहे, समोरच्याचं भरलेलं आहे, कुणाला त्यांच्या ताटातलं मागितलं तर ते देतील का? नाही देणार. तुम्हीही देणार नाहीत. ताटातील जे आहे ते सर्वांना समान वाटप होण्याची गरज आहे. त्यामुळे खूर्चीवर जाऊन आपण बसलं पाहिजे. राज्यकर्ते होण्याची मानसिकता आपण ठेवणे गरजेचं आहे.
Kartik Aryan : कार्तिकच्या ‘शहजादा’ला पठान आणि अॅन्ट मॅनचा फटका
ही मानसिकता असेल तरच आपण सत्तेकरी होऊ शकतो आणि राज्य करु शकणार असल्याचं त्यांनी म्हटंलय. सत्ता हातात गेण्याची मानसिकता अर्ध्या ओबीसींची आहे तर अर्ध्यांची नाही. जागृतीचा लढा संपुर्ण ओबीसींपर्यंत पोहोचविण्याची खरी गरज असून जोपर्यंत हा लढा सर्वांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत हातात यश येणार नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.
ओबीसी समाज विभागला असून अर्धा ओबीसी स्वत:च्या जगण्याच्या प्रश्नाला महत्त्व देत आहे. उर्वरित ओबीसी देवाच्या बाजूने उभा राहिला. आपण स्वत:लाच मानसन्मान द्यायला तयार नाही. हाच खरा लढा आहे. आपण एकमेकांचा सन्मान करणार नाही, तोपर्यंत यशस्वी होणार नसल्याचंही त्यांनी म्हटंलय.
दरम्यान, अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथल्या ओबीसी परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. याप्रसंगी ओबीसी परिषदेतमध्ये विविध ठराव मंजूर करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे आयोजित ओबीसी परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. परिषदेमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले.