कधीही न चिडणारे माजी मुख्यमंत्री चव्हाण संतापले.. म्हणाले, भाजपच्या फायद्यासाठी वंचितने..

कधीही न चिडणारे माजी मुख्यमंत्री चव्हाण संतापले.. म्हणाले, भाजपच्या फायद्यासाठी वंचितने..

Prithviraj Chavan : कसबा आणि पिंपरी चिंचवड (kasba Chinchwad Bypoll Result) या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा तर चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चिंचवडमधील अपयशाला वंचित बहुजन आघाडीला (VBA) जबाबदार धरले आहे.

वाचा : Chinchwad Election Live : तब्बल 27 हजार मतांनी अश्विनी जगताप आघाडीवर तर नाना काटे

चव्हाण म्हणाले, की चिंचवडच्या निवडणुकीत विरोधकांची मतांचे विभाजन करण्यासाठी एक उमेदवार उभा केला गेला. त्या उमेदवाराने बरीच मते खाल्ली. त्यामुळे तिथे भाजपचा विजय झाला. चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद नसताना महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन करण्यासाठी आणि भाजपला फायदा करून देण्यासाठी उमेदवार उभा केला होता. वंचित बहुजन आघाडीने चिंचवडमध्ये उमेदवार उभा केला नसता तर निवडणुकीचे चित्र वेगळे राहिले असते. पण, वंचितमुळे ही जागा गेल्याचे चव्हाण यांनी बोलून दाखविले.

 Chinchwad By Election : कलाटेंनी काटेंची ‘शिट्टी’ वाजवली, तर अश्विनी जगतापांची विजयाकडे वाटचाल

दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवार अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होती. महाविकास आघाडीचे नाना काटे आणि राहुल कलाटे अपक्ष म्हणून रिंगणात होते. कलाटे आणि काटे यांच्यात मतांची विभागणी झाली. याचा फायदा भाजपच्या जगताप यांना मिळाल्याचे दिसून आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube