सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पुण्यातून 5 हजार राख्या; दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचा उपक्रम

Punit Balan अध्यक्ष पुनीत बालन यांचे मेजर जनरल मनोज जोशी यांना पत्र पाठवून राख्या स्वीकारण्याची विनंती

Punit Balan

Punit Balan to Send 5,000 Rakhis to Border Soldiers :रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यातील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने 5 हजार राख्या पाठविण्यात येणार आहेत. या राख्या ‘सेवा सदन दिलासा कार्यशाळा’ या संस्थेत तयार करण्यात आल्या आहेत.

दिशा सालियन प्रकरणात कोर्टाचा गंभीर सवाल; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण, कोर्टाचं निरीक्षण काय?

या उपक्रमाबाबत ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील 19 इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल मनोज जोशी यांना पत्र पाठवून या राख्या स्वीकारण्याची विनंती केली आहे. पुण्यातून पाठविलेल्या या राख्या जवानांच्या मनगटावर बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना या उपक्रमामागे आहे.

पुनीत बालन यांनी पत्रात म्हटले आहे की, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर हे पुणे शहराच्या आध्यात्मिक अभिमानाचे प्रतीक आहे. संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात.

तिबेटमध्ये पुन्हा धरण फुटल्याने नेपाळला धोका; महापुरानंतर नव्या संकटाचा इशारा, 450 जणांचा मृत्यू

याच सामाजिक बांधिलकीतून रक्षाबंधनानिमित्त देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी 5 हजार राख्या पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या राख्या बौद्धिक अपंगांसाठी कार्यरत असलेल्या ‘सेवा सदन दिलासा कार्यशाळा’ येथे तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच विशेष गरजा असलेल्या व्यक्तींना रोजगार व सन्मानाची संधी देण्याचा संदेशही या उपक्रमातून दिला जात आहे.

“कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे, हे मी माझे भाग्य समजतो. आपल्या कुटुंबीयांपासून हजारो मैल दूर राहून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवान बांधवांसाठी पाच हजार राख्या पाठविण्यात येणार आहेत. या राख्या ‘सेवा सदन दिलासा कार्यशाळा’ या संस्थेत तयार झालेल्या आहेत,” असे पुनीत बालन यांनी सांगितले.

देशाचा मूड काय?, पंतप्रधानपदासाठी सर्वात जास्त पसंती कुणाला?, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? तिसरा नेता कोण?

या उपक्रमासाठी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, वर्षा थोरवे, खजिनदार ॲड. सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषा खेडेकर, विश्वस्त डॉ. पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे यांचे सहकार्य लाभले आहे.

follow us