नेपाळनंतर आता चीनही हादरलं, भूकंपाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नक्की काय घडलं?

नेपाळ आणि चीनमधील या सलग नैसर्गिक आपत्तींमुळं संबंधित यंत्रणांसमोर बचाव आणि मदतकार्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

News Photo   2026 08 28T115923.257

नेपाळमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली (Nepal) भूकंपानंतर आलेल्या जलप्रलयामुळं परिस्थिती अद्याप गंभीर आहे. या नैसर्गिक आपत्तीत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. आपत्तीला तिसरा दिवस उलटूनही अनेक भागांतील जनजीवन पूर्वपदावर आलेलं नाही. पुराच्या प्रचंड प्रवाहात अनेक गावं, घरं, शेती, इमारती आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचं नुकसान झाल्याने नागरिकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.

दरम्यान, नेपाळमधील संकटाची तीव्रता कायम असतानाच चीनमध्येही भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला आहे. अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि अनेकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धाव घेतली. भूकंपामुळं काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये चिंतेचं सावट आहे. नेपाळ आणि चीनमधील या सलग नैसर्गिक आपत्तींमुळं संबंधित यंत्रणांसमोर बचाव आणि मदतकार्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

नेपाळवरील महापुराचं संकट भीषण, मृतांचा आकडा पोहचला 392 वर, 1200 जण बेपत्ता

 

follow us