Video : कोर्टाचा निर्णय संभ्रमात टाकणारा; सत्तासंघर्षाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Video : कोर्टाचा निर्णय संभ्रमात टाकणारा; सत्तासंघर्षाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray On Maharashtra Political Crisis :  राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  कोर्टाचा निर्मय संभ्रमात टाकणारा आहे. कोर्टाची भाषा ही लवकर कळत नाही. मला देखील माझ्यावर झालेल्या केसेसमुळे अनेक नोटीस आल्या आहे. पण वाचल्यावर कळत नाही की सोडलय की अटक केलीय, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले आहे.

कोर्टाची भाषा ही तांत्रिक असते. कोर्ट भाषेत लिहिलेल कळत नाही, सोडलय की अटक केलीय. कोर्टाने विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष ठरवत असतो असे म्हटले आहे. आता निवडणुक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह हे एकनाथ शिंदेंकडे दिले आहे. त्यामुळे आता काय होणार हे माहीत नाही. निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टा या वेगळ्या संस्था आहे. त्यामुळे ही सगळी धूळ बसू द्या म्हणजे सर्वांना कळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Video : अखेर अजितदादांनी वचपा काढलाचं; म्हणाले, इथं रडण्यापेक्षा…

 

 

यावेळी ते दौऱ्यावर होते.  आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता महापालिकाच्या निवडणुका आहेत. 2024च्या विधानसभा निवडणूका आहे. त्याआधी हा दौरा करत आहे. गेल्या काही दिवसापांसून मला हा दौरा काढायचा होता, असे त्यांनी सांगितले आहे.

Sanjay Raut : त्यांनी वकिली केली, पण कायद्याची पुस्तकं पुन्हा चाळायला हवी, राऊतांचा फडणवीसांना टोला

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. न्यायालयाने बहुमतचाचणीपासून घेतलेला प्रत्येक निर्णय हा बेकायदेशीर ठरवलेला आहे. तरीही हे नागडे का नाचत आहे व पेढे कुणाला भरवत आहे, असे टोला त्यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड ही बेकायदेशीर ठरवली आहे. देवेंद्र फडणवीस हे वकील आहे. त्यांनी नागपूरमध्ये प्रॅक्टीस केली असल्याचे ते सांगत असतात. त्यांनी पुन्हा एकदा कायद्याची पुस्तक चाळायला पाहिजे. पुन्हा एकदा रिव्हीजन करायला पाहिजे. कधी-कधी रिव्हीजन करण्याची वेळ येते, असे टीका राऊतांनी केली

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube