असले निर्णय देशाला परवडणारे नाहीत; नोटबंदीवर राज ठाकरेंनी सुनावलं

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (55)

Raj Thackeray’s comment on demonetisation decision : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2000 रुपयांची नोट (2000 rupee note) चलनातून काढून घेतली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनांनुसार, देशातील सर्वसामान्य लोकांना 23 मे ते 20 सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बदलून घ्याव्या लागतील. अर्थात तोपर्यंत 2000 च्या नोटा चलनात राहतील आणि व्यवहारही करता येतील, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतर यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीला धरसोडपणा असल्याची टीका केली. तसंच नवीन नोटा बाजारात आल्यावर त्या मशीनमध्ये गेल्या की नाही हे तपासलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिक दौऱ्यावर असताना ते शनिवारी (20 मे) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर 2000 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. आता त्या नोटा पुन्हा बंद केल्या. यावर बोलतांना राज ठाकरे म्हणाले, मी नोटाबंदी झाली होती, तेव्हा एक भाषण केले होते. हा धरसोड करण्याचा एक प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारून या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आली नसती, असं त्यांना सांगितलं.

मिस्ड कॉल द्या, अर्ज भरा अन् मदत मिळवा; मुख्यमंत्री सहायता निधीत मोठा बदल

ते म्हणाले, कधी एखादी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. सुरवातीला नोटबंदी झाली त्यावेळी नवीन नोटा आणल्या, तर त्या 2000 रुपयांच्या नोटा एटीएममध्ये जात नव्हत्या. म्हणजेच नोटा आणताना त्या मशिनमध्ये जातात की नाही हेही पाहिलं गेलं नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, देशाला असले निर्णय परवडणारे नसतात. आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे जमा करायचे. पुन्हा नव्या नोटा निघतील. हे असं सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.

Tags

follow us