आमदार संजय गायकवाडच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवप्रेमींकडून निदर्शने

यावेळी या गायकवाडचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, गायकवाड मुर्दाबाद अशा घोषणा देत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

News Photo   2026 04 24T204833.357

छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण (Shivray) गेट येथे आज (दि. 24 एप्रिल)रोजी डाव्या पक्षांसह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवप्रेमी म्हणून एकत्र येत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार निदर्षनं केली. यावेळी गायकवाड यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या मथळ्यावरून प्रकाश प्रशांत आंबी या तरुणाला आणि बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने राज्यभरात वातावरण तापलं आहे. अनेक पक्ष, संघटना आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी गायकवाड यांचा निषेध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी हा निषेध नोंदवला आहे.

प्रकाशकाला धमकी प्रकरणी आमदार गायकवाड मवाळ; पुस्तक प्रकाशक प्रशांत आंबी यांची दिलगिरी व्यक्त

यावेळी या गायकवाडचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, गायकवाड मुर्दाबाद अशा घोषणा देत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर सरकारने तात्काळा काही दखल घेतली नाही तर बुलढाण्यात जावून आमदार गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणाही यावेळी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनाही या गायकवाडवर कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रति हातात घेऊ सर्वजनांनी निषेध नोंदवला, तसंच पुस्तकाच्या प्रती विक्रिसाठी ठेवल्याने यावेळी काही विक्रीही करण्यात आली.

दरम्यान, या निषेध निदर्शनामध्ये मोर्चामध्ये कॉमरेड राम बाहेती, कॉमरेड अॅड. अभय टाकसाळ, भगवान भोजने, प्रकाश शिरसाट, उमाकांत राठोड, सुनील राठोड, धनंजय बोर्डे, कीरनराज पंडित, अँड. सागरदास मोरे, प्रा. भास्कर गायकवाड, प्रा. सुदाम चिंचाणे, अँड. दत्ता हूड, इंद्रकुमार जेवरीकर, अश्फाक सलामी, लोकेश कांबळे, अरुण मते, अॅड, सुनील राठोड, भीमराव बनसोड, मनिषा बल्लाळ, समाधान बारगळ, यांच्यासह डावे आंबेडकरवादी व परिवर्तनवादी चळवळीत कार्यकर्ते शिवप्रेमी मान्यवर उपस्थित होते.

follow us