‘संपादक’ संजय राऊत CM शिंदेंना थेट भिडणार? पत्रकार परिषदेचा पास मिळाला, प्रश्नही तयार

‘संपादक’ संजय राऊत CM शिंदेंना थेट भिडणार? पत्रकार परिषदेचा पास मिळाला, प्रश्नही तयार

Sanjay Raut : औरंगाबादमध्ये आज (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत आहे. या बैठकीच्या अनुषंगाने विरोधकांकडून आरोप केले जात होते. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर खोचक प्रतिक्रिया देत आपण एक पत्रकार म्हणून या पत्रकार परिषदेला जाणार आहोत असं सांगितलं होतं. त्यानंतर आज त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा पास मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संजय राऊत शिंदेच्या पत्रकार परिषदेला जाणार का? यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले संजय राऊत?

शुक्रवारी या बैठकीवर टीका करताना राऊत म्हणाले होते की, या पत्रकार परिषदेला जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली तर आपण स्वतः पत्रकार म्हणून तेथे जाऊ आणि मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारू असे राऊत म्हणाले. त्यानंतर आज त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा पास मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

Weather Update : तीन दिवस मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मात्र ते यावर असं देखील म्हणाले की, मी एक संपादक आहे. या महाराष्ट्रतला ज्येष्ठ संपादक आहे. माझी इच्छा झाली तर मी जाईल. पण मी गेलो तर गोंधळ निर्माण होईल. तो गोंधळ मला नको आहे. असं राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे यावरून तरी राऊत शिंदेच्या पत्रकार परिषदेला जाणार नाहीत असंच दिसत आहे.

मोठी बातमी! आता ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’ जिल्हा; शहरांनंतर जिल्ह्यांचेही नामकरण

दरम्यान, औरंगाबादमध्ये पार पडणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शहरातील पंचतारांकीत हॉटेल राम इंटरनॅश्नलमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांसाठी 30 रूम बुक करण्यात आल्या आहेत.याशिवाय दुसरे फाईव्ह स्टार हॉटेल असलेल्या ताज हॉटेलमध्ये सर्व सचिवांसाठी 40 रूम्स बुक करण्यात आल्या असून, उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकाऱ्यांसाठी अमरप्रीत हॉटेलमधील 70 तर, अजंता अॅम्बेसेडरमध्ये 40 रूम बुक करण्यात आल्या आहेत.

भाविकांवर काळाचा घाला! भीषण अपघातात पाच ठार, 11 जखमी

त्याशिवाय सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकांसाठी महसूल प्रबोधिनी आणि पाटीदार भवन येथील 100 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. प्रशासनातील इतर अधिकारी वर्गासाठी वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे येथे 20 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. अलिशान हॉटेलमधील निवासी व्यवस्थेसोबतच नेते मंडळी, सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या जाण्या येण्यासाठी 300 गाड्यांचा ताफा बुक करण्यात आला आहे. या सर्व अधिकारी आणि मंत्र्यांना ने-आण करण्यासाठी नाशिक आणि औरंगाबाद शहरातील 150 गाड्या भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube