SBI महाराष्ट्राचे मुख्यालय आता पुण्यात; वाढती आर्थिक ताकद पाहता बँकेचा मोठा निर्णय
SBI Bank : देशाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने मोठा निर्णय घेत महाराष्ट्र सर्कलचे मुख्यालय मुंबईहून पुण्याला हलवले आहे.
SBI Bank : देशाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने मोठा निर्णय घेत महाराष्ट्र सर्कलचे मुख्यालय मुंबईहून पुण्याला हलवले आहे. गेल्या काही दिवसात पुणे शहराची वाढती आर्थिक ताकद पाहता आणि राज्यातील इतर बँकेंसाठी उपलब्ध असलेल्या विकासाच्या महत्वपूर्ण संधींचा लाभ घेण्याच्या रणनीतीचाच भाग म्हणून एसबीआयने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
एसबीआयच्या (SBI) महाराष्ट्र सर्कलचे मुख्यालय (SBI Maharashtra Headquarters) मुंबईहून (Mumbai) पुण्याला हलवणे ही बँकेची महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक चाल मानली जात आहे. आयटी क्षेत्र, वाहन निर्मिती आणि उत्पादन क्षेत्रांमुळे पुण्यात गेल्या काही वर्षात आर्थिक वाढ झपाट्याने वाढली आहे. याचा थेट फायदा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला झाला आहे. ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमांसह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांनी, एक अग्रगण्य आर्थिक केंद्र म्हणून पुण्याचे स्थान अधिकच बळकट केले आहे. त्यामुळे या शहरात मुख्यालय असल्याने बाजारपेठेशी कनेक्शन लवकर निर्माण करता येणार या उद्देशाने एसबीआयने मुंबईहून आपला मुख्यालय पुण्यात (Pune) हलवण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयचे हे मुख्यालय पुण्यातील खराडी परिसरात असून आज (24 एप्रिल) देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या प्रमुख उपस्थितीत या ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे
महाराष्ट्र बँकेचे देशातील मुख्यालय देखील पुण्यात असून याचबरोबर जेपी मॉर्गन, मास्टरकार्ड, कॅपिटलँड , UBS बार्कलेंझ या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे देखील ऑफिसेस पुण्यात आहे.
एसबीआयचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी (Srinivasulu Shetty) म्हणाले की, बँकेसाठी विकासाचे एक प्रमुख इंजिन म्हणून उदयास आलेल्या या राज्याशी अधिक जवळीक साधण्याच्या गरजेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्पष्ट झाले की, या गतिमान राज्याची क्षमता पूर्णपणे साध्य करण्यासाठी आम्हाला त्याच्याशी अधिक जवळीक असणे आवश्यक होते. त्यामुळे, साहजिकच पुणे हीच आमची निवड ठरली असे ते म्हणाले.
Smt @nsitharaman inaugurated @TheOfficialSBI‘s Local Head Office (LHO) – Maharashtra Circle, in Kharadi, Pune.
The Maharashtra Circle serves 29 Districts, has 1,273 Branches, with over 13,000 bank staff.
The new LHO has over 1.80 lakh sq. ft. of modern office space. pic.twitter.com/42lNsx7KFH
— Nirmala Sitharaman Office (@nsitharamanoffc) April 24, 2026
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठी नियम 4, 78 व 85 मध्ये मोठे बदल-
तर दुसरीकडे महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक परिसंस्थेचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. माहितीनुसार, देशातील एकूण बँकिंग ठेवींपैकी 20 टक्क्यांहून अधिक ठेवींचा वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. राज्यात एसबीआयचे जवळपास 1,270 हून अधिक शाखा आहेत. तसेच एसबीआयच्या रिटेल बँकिंग व्यवहारांमध्ये राज्याची भूमिका महत्त्वाची आहे. तर पुणे शहर महाराष्ट्र सर्कलच्या एकूण ठेवींपैकी 27 टक्के आणि एकूण कर्जांपैकी 35 टक्के वाटा उचलत आहे.