शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पाचवीसह आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पाचवीसह आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई : राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला. त्यानुसार इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी, तर आठवीचे 12.53 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे

राज्यभरातील इयत्ता पाचवीच्या एकूण 3, 82, 797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 91,400 विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा 2,79,466 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 35,034 विद्यार्थी पात्र ठरले आहे. राज्य परीक्षा परिषदेने 7 नोव्हेंबरला झालेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर केला होता. त्यानंतर 7 ते 17 नोव्हेंबर दरम्यान शाळेकडून गुण पडताळणीसाठीच्या अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची छाननी करून मंगळवारी रात्री हा निकाल जाहीर करण्यात आलाय.

शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉगइनमधून; तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. http://www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून दिलाय. शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. परिषदेने डिसेंबर महिन्यात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती.

अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळं अर्ज भरण्यास संधी न मिळाल्यानं मुदतवाढ दिली. त्यामुळं परीक्षेचं नियोजन कोलमडलं आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर एकीकडे दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा आणि दुसरीकडे टीईटी परीक्षेतील गैरप्रकार, यामुळं शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्या कंपनीला द्यावी? असा प्रश्न परीक्षा परिषदेसमोर होता. मात्र सरकारनं विनर कंपनीच्या सहकार्यानं परीक्षा घेण्याची सूचना दिली.

राज्यभरातील अनुसूचित जाती-जमाती, तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. मध्यंतरी 2020 ते 2021 या कालावधीत कोरोनानं थैमान घातले. यामुळं शाळा महाविद्यालयं बंद होती. मात्र शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनं सुरु होता. या काळात विदयार्थी आर्थिक अडचणीत असताना त्यांनी प्रवेश घेत शैक्षणिक वर्ष सुरु ठेवले. शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीपासून जिल्ह्यातील 1700 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याची आकडेवारी समोर आलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube