विवाहित असल्याचं गुपित ठेवून लग्नाचं आमिष, आणि मग रिसॉर्टमध्ये नेऊन अत्याचार? नाशिक प्रकरणात पीडितेचे गंभीर आरोप

आरोपीने आपले आधीचे लग्न लपवून पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. जुलै 2022 मध्ये त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप.

  • Written By: Published:
Untitled Design (2)

Serious allegations by the victim in the Nashik case : नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थातच टीसीएस युनिटमध्ये घडलेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत आरोपीवर गंभूर आरोप केले असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचं दिसत आहे.पीडितेच्या म्हणण्यानुसार, सुमारे चार वर्षांपूर्वी तिची आरोपीशी कॉलेजमध्ये ओळख झाली. एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना दोघांमध्ये मैत्री झाली. या काळात आरोपीने तिचा विश्वास संपादन करत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टीसीएसमध्ये नोकरी मिळवून देण्याच आश्वासन दिलं होतं.

तक्रारीनुसार, आरोपीने आपले आधीचे लग्न लपवून पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. जुलै 2022 मध्ये त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे. पुढे ऑगस्ट 2024 मध्ये आरोपी तिला एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेला, जिथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने म्हटले आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये या प्रकरणाला नवे वळण मिळाले, जेव्हा आरोपी आधीच विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती पीडितेला मिळाली. आरोपीच्या पत्नीने स्वतः संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, असे तक्रारीत नमूद आहे. पीडितेने आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, आरोपीला जाब विचारल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला आणि तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. तसेच आरोपी आणि त्याचे काही सहकारी देव-देवतांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचा देखील आरोप तिने केला आहे.

HSC Result 2026 : ‘या’ दिवशी लागणार दहावी- बारावीचा निकाल; संभाव्य तारीख समोर

या प्रकरणात इतर काही सहकाऱ्यांवर देखील लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून त्याची व्याप्ती अधिक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील महिला आरोपी निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तिच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, एका महिलेवर दुसऱ्या महिलेच्या विनयभंगाचा आरोप लागू होत नाही. तसेच ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे देखील न्यायालयास सांगण्यात आले आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात शोधमोहीम सुरू केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून सर्व आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, टीसीएस कंपनीने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, संबंधित महिला आरोपी कंपनीत एचआर मॅनेजर पदावर तसेच या प्रकरणाशी कंपनीचा थेट संबंध नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे. एकूणच, या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.

follow us