Sharad Pawar : २४ वर्षांनी शरद पवार देहूतील संत तुकाराम महाराज मंदिरात, म्हणाले…

  • Written By: Published:
Sharad Pawar : २४ वर्षांनी शरद पवार देहूतील संत तुकाराम महाराज मंदिरात, म्हणाले…

“मागच्या ४०० वर्षांच्या काळात समाजात बदल घडवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं आहे. त्या वर्षांत तुकाराम महाराजांनी समाजाला योग्य दिशा दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात संत तुकाराम महाराजांचा इतिहास दूरचित्रवाणीद्वारे पोहचवला जाणार आहे.” अशी माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. देहू (Dehu) येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रणावरील दिनदर्शिकेच्या अनावरण सोहळ्यास शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा : राबडीदेवीनंतर आज लालूंचा नंबर, लॅण्ड फॉर जॉब घोटाळ्यात सीबीआय करणार चौकशी

तब्बल २४ वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देहूमध्ये आले. शरद पवार यांनी तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात पाऊल ठेवले आहे. देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देत दर्शन घेतले.

देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रणावरील दिनदर्शिकेच्या अनावरण शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. वर्षातील बारा महिन्यातील वेगवेगळ्या बारा प्रसंगांवर तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित चित्र काढले आणि ते सर्व महाराष्ट्र व राज्याच्या बाहेर पर्यंत पोहोचवण्याचे कार्य शेगावमधील चित्रकार रुपेश मिस्त्री यांनी केले आहे. यानिमित्ताने जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे जीवन व त्यांचा संदेश घराघरात पोहचेल याचे समाधान आहे. असं शरद पवार यावेळी म्हणाले.

आपण वारी केली नाही, पण…

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मी वारी केली नाही, पण त्याचा अनादरही केला नाही. ते पुढे म्हणाले की, “मी देव-दानव यापासून लांब असतो. पण काही देवस्थान अशी आहेत जी अंत:करणात आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेगाव, आळंदी, देहूत आल्यानंतर मानसिक समाधान मिळतं.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube