Sharad Pawar : सासऱ्यामुळे मी क्रिकेटमध्ये, शरद पवारांनी सांगितला क्रिकेटच्या राजकारणातल्या प्रवेशाचा किस्सा
“माझे सासरे सदूराव शिंदे भारतीय संघातील खेळाडू. ते गुगली बॉलर होते. त्यामुळे माझ्या लग्नात अनेक क्रिकेटपटू आले होते. त्यानंतर या सर्व खेळाडूंशी जवळीक निर्माण झाली. मग मी गरवारे क्लबचा अध्यक्ष झालो.” अशी आठवण शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये बोलताना सांगितली. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या तारांगण युवा महोत्सवात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
या मुलाखतीमध्ये त्यांना क्रिकेटमध्ये कसा प्रवेश झाला असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, “माझे सासरे सदूराव शिंदे भारतीय संघातील खेळाडू. ते गुगली बॉलर होते. त्यामुळे माझ्या लग्नात अनेक क्रिकेटपटू आले होते. त्यानंतर या सर्व खेळाडूंशी जवळीक निर्माण झाली. मग मी गरवारे क्लबचा अध्यक्ष झालो.
हेही वाचा : Shinde VS Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मराठी मुस्लिम सेवा संघाचं पत्रक, केलं ‘हे’ आवाहन
त्यावेळी क्लबमध्ये काहीवाद होते. ते मिटत नव्हते. मी हे वाद मिटवायचा प्रयत्न केला. गरवारे क्लबनंतर मुंबई क्रिकेटची निवडणूक लढवली. पुढे जाऊन भारतीय क्रिकेट मंडळ म्हणजे बीसीसीआयचा अध्यक्ष झालो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. पण त्यानंतर मी क्रिकेटचा राजीनामा दिला. तेव्हापासून परत तिकडे पाहिले नाही. असंही त्यांनी यावेळी आठवणीने सांगितले.
साताऱ्याच्या सभेचं श्रेय माझं नाही
शरद पवार यांनी पावसातली सभेची आठवण सांगितली. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी साताऱ्यात ही सभा झाली होती. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, साताऱ्याच्या सभेचं श्रेय माझं नाही. मी बोलायला उभं राहिलो पाऊस आला. पहिल्यांदा वाटलं, आता सभा संपली. पण लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकांना सभा ऐकायची आहे. मग मी बोलत राहिलो. लोकांनी ऐकलं. अन् आमचा उमेदवारही निवडून दिला.